Pune News : पुण्यात माणुसकीला काळीमा! कचरा वेचणाऱ्यांवर उकळतं पाणी ओतलं, दोघांचा मृत्यू

Pune Crime News : यात तिघे गंभीररीत्या भाजले गेलेत. दोघांचा मृत्यू झाल्यानं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडालीय

Pune News : पुण्यात माणुसकीला काळीमा! कचरा वेचणाऱ्यांवर उकळतं पाणी ओतलं, दोघांचा मृत्यू
सासवडमधील दोन भिक्षुकरींच्या हत्येप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखलImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 9:55 AM

पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना (Inhuman incident in Pune) घडली. तिघांवर उकळतं पाणी ओतण्यात आलं होतं. यात दोघांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. गंभीर जखमी असलेल्या एकावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुण्यातील (Pune News) सासवड मध्ये माणुसकीला काळीमा फासणारी ही धक्कादायक घटना घडली. कचरा वेचणाऱ्या तिघांवर एका हॉटेल चालकानं उकळतं पाणी ओतलं. यात तिघे गंभीररीत्या भाजले गेलेत. दोघांचा मृत्यू झाल्यानं संपूर्ण जिल्ह्यात (Saswad, Pune crime) खळबळ उडालीय. 23 मे रोजी दुपारी ही घटना घडली होती. मात्र आता ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी कचरा वेचणाऱ्यांवर उकळपं पाणी फेकणाऱ्या हॉटेल चालकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जातेय. मात्र पोलिसांवर स्थानिक आमदारांचा दबाव असल्याचाही आरोप केला जातोय.

घटनेचे व्हिडीओही व्हायरल

दरम्यान, या घटनेप्रकरणाचे काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. कचरा वेचणारी एक वृद्ध महिला या घटनेबाबत माहिती देत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या वृद्ध महिलेचाही आता मृत्यू झालाय. या वृद्ध महिलेचं नाव शेवंताबाई असून तिचं वय 60 वर्ष होतं. या घटनेचे काही व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेत. या व्हिडीओमध्ये शेवंताबाई यांच्याकडे एक महिला या घटनेची माहिती विचारत असल्याचं निदर्शनास आलंय.

अमानुष कृत्य

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक इसम बेशुद्ध अवस्थेत पायऱ्यावर निपचित पडल्याचं दिसून आलंय. या इसमाच्या हातावर आणि शरीरावर ठिकठिकाणी गंभीर जखमा झाल्याचं आणि भाजलेल्याचं व्हिडीओमध्ये दिसलंय. या संपूर्ण घटनेवरुन संपात व्यक्त केला जातोय. हॉटेल चालकानं रस्त्यावर कचरा वेचणाऱ्या तिघांवर उकळतं पाणी फेकल्याचा आरोप केला जातोय. हॉटेलचालक निलेश उर्फ पप्पू जगपात यानं हे कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला असून हा हॉटेल चालक सध्या फरार आहे. हा हॉटेल चालकाविरोधात संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त केला जातोय.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ :

घटनेची चौकशी करा – शिवतारे

शिवसेने नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी या घटनेवरुन तीव्र संताप व्यक्त केला आहे. पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर ही घटना अमानुष घडली. खोटे पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवून हे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप करण्यात आलाय. पोलिसांना याप्रकरणी दबाब असल्याचा आरोप शिवतारे यांनी केली आहे. याप्रकरणी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विजय शिवतारे यांनी केली आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.