Pune Crime : असे काय झाले, मातेनेच आपल्या चार वर्षांचा मुलास संपवले

Pune Crime News : पुणे जिल्ह्यातून धक्कादायक घटना उघड झाली आहे. या घटनेमुळे संवेदनशील व्यक्तींना हादरला बसला आहे. आईनेच मुलाची हत्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

Pune Crime : असे काय झाले, मातेनेच आपल्या चार वर्षांचा मुलास संपवले
Follow us
| Updated on: Aug 29, 2023 | 12:11 PM

पुणे | 29 ऑगस्ट 2023 : पुणे शहर आणि जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली आहे. परंतु गुन्हेगारीचा कळस झालेली घटना जेजुरीमध्ये घडली आहे. आई आणि मुलाच्या नात्यास काळीमा लावणारी ही घटना घडली आहे. या घटनेत सख्या मातेने आपल्याच चार वर्षांच्या मुलाचा जीव घेतला आहे. या धक्कादायक घटनेमुळे सर्वच संवेदनशील लोकांना धक्का बसला आहे. यासंदर्भात पोलिसांच्या तपासात हत्येचे कारण स्पष्ट झाले आहे.

काय आहे प्रकार

जेजुरी येथील मोडलिंब येथे राहणाऱ्या रेणू शंकर पवार या महिलेने तिचा मुलगा चुटक्या हिची गळा दाबून हत्या केली. रेणू पवार हिचे उमेश अरुण सांळुके यांच्याशी प्रेमसंबध होते. या प्रेमात तिला चुटक्याचा अडथळा येत होता. यामुळे आईने तिच्या मुलाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. चुटक्या मिळत नसल्यामुळे रेणू पवार हिच्या चुलत बहिणेने पोलिसांकडे तक्रार केली होती.

पोलीस तपासात उघड झाला प्रकार

चार वर्षांचा मुलगा बेपत्ता झाला यासंदर्भातील फिर्याद पोलिसांकडे आली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. रेणू पवार हिची चौकशी सुरु केली. तिच्या बोलण्यात विसंगती आढळली. तिला पोलिसांचा खाक्या दाखवताच तिने सगळा प्रकार सांगितले. प्रेमात अडथळा येत असल्यामुळे तिने खून केल्याचे कबुल केले.

हे सुद्धा वाचा

मृतदेहाची विल्हेवाट लावली

मुलाची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह साडीत गुंडाळून माळशिरसजवळील घाटात फेकून दिला. ही घटना दीड महिन्यांपूर्वी घडली होती. या खून प्रकरणात पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक मनोज नवसारे यांनी दिली.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.