Pune Murder : नकार देऊनही गर्लफ्रेन्ड लग्नासाठी मागे लागली, बॉयफ्रेन्डने सुपारी देत केली हत्या! चौघांना अटक

Pune Murder News : बजरंग तापडे याचे एका महिलेशी अनैतिक प्रेमसंबंध होते. अनैतिक संबंधातून महिलेनं बजरंग याच्याकडे लग्नाता तगादा लावला होता. लग्नासाठी हट्ट धरलेल्या महिलेला बजरंग याने नकार दिला होता.

Pune Murder : नकार देऊनही गर्लफ्रेन्ड लग्नासाठी मागे लागली, बॉयफ्रेन्डने सुपारी देत केली हत्या! चौघांना अटक
मुक्ताईनगर महिलेच्या हत्येतील आरोपी सापडलेImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 28, 2022 | 9:21 AM

पुणे : प्रियकराने प्रेयसीची (Boyfriend Killed girlfriend) सुपारी देत तिची हत्या केली असल्याचं उघड झालंय. तब्बल 4 लाख रुपये एडव्हान्स पैसे देऊन आपल्याच प्रेयसीचा खून (Pune crime News, Maval Murder) घडवून आणणाऱ्याला पोलिसांनी अटक केलीय. आतापर्यंत याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केलीय. या खळबळजनक हत्याकांड प्रकरणाचा उलगडाही पोलिसांनी केलाय. 9 ऑगस्ट रोजी हत्येची (Murder News) ही घडना उघडकीस आलेली. धारदार शस्त्राने वार करत या महिलेचा खून करण्यात आलेला. प्रियकराने प्रेयसीचा फोटो दाखवून तिला संपवा, असं म्हणत तिच्या हत्येची सुपारी दिली होती. चार लाख रुपयांची रोख रक्कमही त्यासाठी देण्यात आल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलंय.

9 ऑगस्ट रोजी हत्या

मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे हे खळबळजनक हत्याकांड 9 ऑगस्ट रोजी घडलं होतं. क्राईम ब्रांचने या हत्याकांडाची उकल केलीय. मुख्य आरोपीसह इतर तिघा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. या सगळ्यांच्या चौकशीतून हत्येचा कट रचण्यापासून ते हत्या करण्यापर्यंतचा थरारक घटनाक्रमही समोर आलाय.

सुपारीसाठी मित्राची मदत

बजरंग तापडे याचे एका महिलेशी अनैतिक प्रेमसंबंध होते. अनैतिक संबंधातून महिलेनं बजरंग याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला होता. लग्नासाठी हट्ट धरलेल्या महिलेला बजरंग याने नकार दिला. लग्नासाठी नकार देऊनही महिलेनं बजरंगला लग्न करण्यासाठी वारंवार विचारणा केली होती. अखेर वैतागून प्रेयसीला संपवण्याचाच निर्णय बजरंगने घेतला. त्याने आपल्या प्रेयसीचा फोटो जवळचा मित्र पाडुंरंग हारके याला दिला आणि तिच्या हत्या करण्यासाठी सुपारी दे, असं सांगितलं. यासाठी सात लाख रुपये देण्याचंही बजरंग याने मंजूर केलं.

हे सुद्धा वाचा

चौघांना अटक

बंजरंगचा मित्र पांडुरंग हारके यांना त्याच्या ओळखीच्या गुन्हेगार मित्राशी संपर्क साधला. गुन्हेगार प्रवृत्तीचा असलेल्या सचिन थिगळे याला बोलावून त्याला बजरंगच्या प्रेयसीचा फोटो दिला आणि तिची हत्या करण्यास सांगितलं. यासाठी त्याने चार लाख रुपये एडव्हानसही दिला. अखेर 9 ऑगस्टला बजरंगच्या प्रेयसीची धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली होती. या हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी बजरंग तापडे, त्याचे साथीदार पांडुरंग उर्फ सागर हारके, सचिन थिगळे, सदानंद तुपकर अशा एकूण चौघांना अटक केलीय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.