Pune crime | पुणे सायबर पोलिसांची कारवाई ; टीईटी, म्हाडा पेपर फुटी प्रकरणातील आणखी तीन दलालांना अटक
टीईटी 2018 मध्ये आरोपी मुकुंदा याने अपात्र उमेदवारांना पात्र करण्याचे आमिष दाखवून तब्बल 80 लाख रुपये एजंट हरकळ बंधूंना दिल्याचे सांगितले. त्याशिवाय 2019 च्या टीईटी परीक्षेत 1 कोटींवर रक्कम पोहोच केली. आरोपींनी ऑक्टोबर 2018 मध्ये परीक्षार्थींची यादी पेनड्राईव्हमध्ये दिली होती. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून आरोपी मुकुंदा सूर्यवंशीकडे सखोल तपास करणे आवश्यक आहे.
पुणे – महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळ्यासह म्हाडा पेपर फुटीप्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी आणखी तीन दलालांना अटक केली आहे. संबंधित एजंटांनी उमेदवारांकडून कोट्यवधीची माया गोळा करून वाटून घेतल्याचे तपासात उघड झालं आहे. नाशिक, बुलढाणा, लातूर परिसरात छापे मारून दलालांना अटक करण्यात आली आहे. मुकुंदा जगन्नाथ सूर्यवंशी (वय 33, रा. नाशिक), कलीम गुलफेर खान (वय 52, रा. बुलढाणा), जमाल इब्राहिम पठाण (वय 40, रा. लातूर) अशी अटक केलेल्या दलालांची नावे आहेत. त्यामुळे टीईटीसह म्हाडा पेपर फुटीप्रकरणातील आणखी आर्थिक गैरव्यवहार उघडकीस येणार असल्याची महिती पोलिसांनी दिली आह पोलिसांनी सांगितले.
उमेदवारांना पात्रकरण्याचे आमिष
टीईटी 2018 मध्ये आरोपी मुकुंदा याने अपात्र उमेदवारांना पात्र करण्याचे आमिष दाखवून तब्बल 80 लाख रुपये एजंट हरकळ बंधूंना दिल्याचे सांगितले. त्याशिवाय 2019 च्या टीईटी परीक्षेत 1 कोटींवर रक्कम पोहोच केली. आरोपींनी ऑक्टोबर 2018 मध्ये परीक्षार्थींची यादी पेनड्राईव्हमध्ये दिली होती. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, गुन्हयाची व्याप्ती खूप मोठी आहे. त्यामुळे आरोपी मुकुंदा सूर्यवंशीकडे सखोल तपास करणे आवश्यक आहे.
परीक्षार्थींची यादी पेनड्राईव्हमध्ये दिली
यापूर्वी अटक केलेल्या संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ या आरोपींना परीक्षार्थींची यादी पेनड्राईव्हमध्ये दिली. ते परीक्षार्थी नक्की कोणते आहेत त्यांची नावे अटक आरोपींकडून प्राप्त करायची आहेत. तसेच टीईटी 2018 च्या परीक्षेमध्ये मार्क वाढविण्यासाठी परीक्षार्थी कोणामार्फत आरोपींच्या संपर्कात आले आहेत त्यांनी कोणाच्या मार्फत सूर्यवंशीला पैसे दिलेले आहेत. एकूण किती पैसे दिले आहेत. याबाबत सखोल तपास करायचा आहे, न्यायालयाने आरोपीला 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
रात्री उशिरा अनन्या पांडे ईशान खट्टर दिसले एकत्र, एकाच गाडीने गेले घरी; फोटो व्हायरल