Pune cyber crime | ऑनलाईनच्या जाळ्यात फसला, 34 लाख गमवून बसला, पण प्रथमच असे घडले की…

Pune cyber crime cases | पुणे शहरात फसवणुकीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. सायबर चोरट्यांकडून अनेकांची फसवणूक केली जात आहे. दोन दिवसांपूर्वी एकाची 34 लाखांत फसवणूक झाली. पुणे सायबर सेलकडे तक्रार आली अन्...

Pune cyber crime | ऑनलाईनच्या जाळ्यात फसला, 34 लाख गमवून बसला, पण प्रथमच असे घडले की...
Follow us
| Updated on: Sep 16, 2023 | 3:59 PM

पुणे | 16 सप्टेंबर 2023 : सध्या सर्व काही ऑनलाईन झाले आहे. यामुळे एका मोबाईल ॲपमधून अनेक गोष्टी साध्य होतात. त्यातच आता अनेक जण ऑनलाईन पार्टटाईम जॉब शोधत असतात. या प्रकारच्या जॉबमधून आधी थोडे पैसे दिले जातात. त्यानंतर जास्त पैशांचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले जाते. मग लाखो रुपयांमध्ये फसवणूक केल्याचे अनेक प्रकार पुणे शहरात घडले आहे. पुणे शहरात दोन दिवसांपूर्वी 34 लाखांत फसवणुकीचा प्रकार घडला. परंतु सायबर पोलिसांनी प्रथमच 24 तासांत आरोपी शोधला.

काय घडला होता प्रकार

सध्या व्हॉट्सॲपवर ऑनलाईन जॉबचे अनेक मेसेज येतात. गुगल सर्च टास्कचे काम देऊन पैसे दिले जातात. सुरुवातीला त्यासाठी काही रक्कम दिली जाते. त्यानंतर अधिक पैसे मिळण्यासाठी गुंतवणूक करण्यास सांगितले जाते. पुणे शहरातील एका व्यक्तीकडून असेच 34 लाख 97 हजार रुपये घेतले गेले. त्यानंतर त्याला आपली फसवणूक झाल्याचे समजले. मग 12 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल झाला.

सायबर पोलिसांनी सुरु केला तपास

सायबर पोलिसांकडे तक्रार येताच तपास सुरु करण्यात आला. ज्या खात्यात पैसे गेले, त्याचा शोध सुरु केला. मग तुषार अजवानी याच्या व्हॉलेटवर पैसे गेल्याचे दिसले. त्याचा शोध घेतला असता तो जुहू मुंबई येथील असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोउनि सचिन जाधव यांच्या नेतृत्वाखाली पथकाने मुंबईत जाऊन छापा टाकला. तुषार अजवानी याला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता 18 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. प्रथमच २४ तासांत आरोपी पकडला गेला आहे.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी केले आवाहन

टॉस्क फ्रॉड, पार्ट टाईम जॉब, जादा परतावा, कमिशन मिळेल या पद्धतीने आमिष दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहे. यामुळे कोणीही या प्रकारच्या फसवणुकीला बळी पडू नये. असे प्रकार दिसल्यास त्वरित सायबर पोलिसांना संपर्क करावा.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.