Pune Fire Video : कोथरुड येथील इमारतीत अग्नितांडव! रहिवाशांमध्ये घबराट
पुण्यात आगडोंब! रहिवासी इमारतीत आग लागल्यामुळे खळबळ
पुणे : पुण्यातील कोथरुड भागात आगीच्या (Pune Fire News) दोन घटनांची नोंद सकाळपासून करण्यात आली. कोथरुड (Kothrud Fire) येथील आशिष गार्डन जवळील श्रावणधारा सोसायटीमध्ये (Shravandhara Society) सकाळी आग लागली. रहिवासी इमारतीत आग लागल्यामुळे एकच गोंधळ उडाला. या इमारतीच्या आजीबाजूला असलेल्या घरांमधील लोक इमारतीच्या खाली जमले होते. या आगीच मोठं नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जातेय. दरम्यान, आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या आणि एक पाण्याचा बंद घटनास्थळी दाखल झाल्या. तर दुसरीकडे आनंदनगर येथीलही एका इमारतीत पहाटे लाग लागली होती.
श्रावणधारा सोसायटीत आग
सकाळी 10.30-11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर आली. आग आटोक्यात आणण्यासाठी तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांना प्रयत्नांची शर्थ करण्यात आली. सुदैवानं अजूनही या आगीत जीवितहानी झाल्याचं कोणतंही वृत्त समोर आलेलं नाही.
पाहा व्हिडीओ : श्रावणधारा सोसायटीमध्ये आगडोंब
कोथरूड श्रावणधारा सोसायटीतील आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. आग लागलेल्या ठिकाणी त्यांनी पाहणी केली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचं त्यांनी म्हटलं.
दरम्यान, आगीच्या घटनेमुळे शॉर्ट सर्किटमुळे दोन दिवस सोसायटीत वीज पुरवठा होणार नाही. मात्र सोलार पॅनलच्या माध्यमातून सोसायटीत वीज पुरवठा केला जाणार आहे.
प्रभा सोसायटीत आगडोंब
दरम्यान, कोथरुडमध्ये आज पहाटेच्या सुमाराही आगीची घटना घडली होती. पहाटे 4 वाजून 42 मिनिटांनी कोथरुड, पौड रोड, आनंदनगर, प्रभा को ऑप सोसायटीमधे आग लागल्याची वर्दी अग्निशमन दल नियंत्रण कक्षाला मिळाली होती. दरम्यान, अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहचत आगीवर नियंत्रय मिळवलं होतं. शिवाय दोघांचा जीव वाचवण्यात यश आलं होतं.
प्रभा को. ऑप सोसायटीत तीन मजली इमारतीत दुसऱ्या मजल्यावर आग लागली होती. दुसऱ्या मजल्यावरील एका घराच्या खिडकीमधून आगीच्या ज्वाळा बाहेर येत होत्या. या घरात दोघे जण अडकले होते.
दरम्यान, जवानांनी होज पाईप घेऊन वर जाऊन घरात आगीमध्ये अडकलेल्या दोघांची सुखरुप सुटका केली. जवानांनी जेट स्प्रेचा वापर करुन पाणी मारत सुमारे दहा मिनिटात पूर्ण विझवली. या आगीत घरातील लाकडी सामान, सोफा, कपाट, खिडक्या इत्यादी साहित्य जळालं.