pune cylinder blast | पुणे गॅस सिलेंडर स्फोट, पोलीस यामुळे वेगाने लागले कामाला

pune gas cylinder blast | पिंपरी, चिंचवड शहरात गॅस चोरीची काळाबाजार सुरू होता. रविवारी मध्यरात्री नऊ गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. त्यानंतर आरोग्यमंत्री चांगलेच संतापले आहेत. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले होते.

pune cylinder blast | पुणे गॅस सिलेंडर स्फोट, पोलीस यामुळे वेगाने लागले कामाला
Follow us
| Updated on: Oct 10, 2023 | 9:56 AM

रणजित जाधव, पुणे | 10 ऑक्टोंबर 2023 : पिंपरी- चिंचवडमध्ये अवैद्यरित्या गॅस रिफलिंग करताना रविवारी मध्यरात्री भीषण स्फोट झाला होता. एकामागे एक नऊ ते दहा सिलेंडरच्या स्फोटामुळे पिंपरी-चिंचवड हादरले होते. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे जेएसपीएम महाविद्यालय असलेल्या परिसरात हा स्फोट झाला होता. यामुळे आरोग्य मंत्री तानाजी सावंत चांगलेच संतापले होते. त्यांनी सोमवारी घटनास्थळी भेट देत पोलीस अधिकाऱ्यांना सुनावले. तसेच जबाबदारी निश्चित करुन २४ तासांत दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता २४ तासांच्या आताच पोलिसांनी कारवाई केली आहे.

काय केली पोलिसांनी कारवाई

टँकरमधून अवैध गॅस भरताना रविवारी नऊ ते दहा सिलेंडरचा स्फोट झाला होता. या घटनेनंतर राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी पोलिसांची जाहीर खरडपट्टी काढली होती. त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय अ‍ॅक्शनक्शन मोडमध्ये आले आहे. घटनेच्या २४ तासांच्या आता या प्रकरणात चार पोलिसांना आणि दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामध्ये सहायक पोलिस निरीक्षक परवेझ शिकलकर, सहायक निरीक्षक बालाजी ठाकूर यांचा समावेश आहे. तसेच चार पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

पोलिसांच्या शैलीवर प्रश्न

पुणे-बंगलोर महामार्गावर रविवारी रात्री अवैधरित्या टँकरमधून गॅस भरला जात होता. त्यावेळी सिलेंडरचे स्फोट होवून अग्नितांडव झाले होते. आधीच पुणे पोलीस ससून रुग्णालयातून आरोपी पळून गेल्यामुळे अडचणी आले आहेत. त्या प्रकरणात पोलिसांवर टीका होत आहे. आता पिंपरी चिंचवडमध्ये गॅस माफिया तयार झाले असल्याचे स्वत: राज्यातील मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांच्या कार्य शैलीवर प्रश्न उपस्थित केला जात होता.

हे सुद्धा वाचा

गॅसची चोरी हे पोलिसांचे अपयश

पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना अटक केली आहे. टँकर पार्क करण्यासाठी जागा देणाऱ्या मालकाला अटक केली आहे. तसेच चोरीच्या गॅसची विक्री करणारा व्यक्तीला पोलिसांनी पकडले आहे. अवैधरित्या सिलेंडरची वाहतूक करणारा टेम्पो चालकही पोलिसांना मिळाला आहे. दुसरीकडे दोषी पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये गॅस चोरीच्या या प्रकारामुळे पोलिसांचे अपयश अधोरेखित झाले आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.