Pune Honey Trap : प्रदीप कुरुलकर याने ‘त्या’ 24 तासांत केले तपास संस्थांना चकवणारे काम

Pune News Honey Trap : पुणे शहरातून उघड झालेल्या हनी ट्रॅप प्रकरणातील आरोपी प्रदीप कुरुलकर याच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी सुरु आहे. परंतु यावेळी त्याला मिळालेले २४ तास महत्वाचे ठरले. त्यामुळे तपास संस्था अजूनही संभ्रमात आहे.

Pune Honey Trap : प्रदीप कुरुलकर याने  'त्या' 24 तासांत केले तपास संस्थांना चकवणारे काम
Follow us
| Updated on: Sep 05, 2023 | 8:37 AM

पुणे | 5 सप्टेंबर 2023 : पुणे येथील डीआरडीओचे माजी संचालक प्रदीप कुरुलकर पाकिस्तानी गुप्तहेराच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला आहे. पुणे एटीएसकडून त्याची कसून चौकशी केली गेली. परंतु या चौकशीत अजूनही काही माहिती उघड झालेली नाही. या प्रकरणात अनेक धक्कादायक माहिती मिळाली असली तरी प्रदीप कुरुलकर याला मिळालेले २४ तास महत्वाचे ठरले. त्या २४ तासांमुळे प्रदीप कुरुलकर तपास संस्थांना अजूनही संभ्रात ठेवत आहे. तपास संस्था अजूनही प्रतिक्षा करत आहे.

काय केले त्या २४ तासांत

प्रदीप कुरुलकर डीआरडीओच्या अंतर्गत चौकशीत दोषी आढळला होता. त्यानंतर डीआरडीओने दहशतवादी पथकाकडे तक्रार केली. ही तक्रार झाल्यावर प्रदीप कुरुलकर याला चौकशीसाठी बोलवण्यात आले. मात्र एटीएसची तक्रार आणि प्रदीप कुरुलकर याची चौकशी या दरम्यान २४ तास मिळाले. या २४ तासात प्रदीप कुरुलकर याने मोबाईलमधील सर्व डेटा डिलीट केला. त्या डेटाची प्रतिक्षा तपास संस्थांना अजूनही आहे.

आता प्रतिक्षा न्यायवैद्यक शाळेची

प्रदीप कुरुलकर याने डिलिट केलेला डाटा रिकव्हर करण्यासाठी पुणे येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत दिला होता. परंतु पुणे येथील प्रयोगशाळेला तो रिकव्हर करता आला नाही. त्यानंतर सुरत येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत हा डेटा पाठवला आहे. त्याचा अहवाल अजून महिन्याभरात मिळणार आहे. त्यामुळे ही प्रतिक्षा करावी लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

प्रदीप कुरुलकर याचे वकील म्हणतात…

डीआरडीओ वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकरने याने पाकिस्तानी हेराला पाठविलेली माहिती गोपनीय नाही, असा दावा प्रदीप कुरुलकर याच्या वकिलांनी केला आहे. त्याने त्या हेराला दिलेली सर्व माहिती सार्वजनिक संकेतस्थळांवर उपलब्ध आहे, असा दावा डॉ. कुरुलकर याचे वकील ॲड. ॠषीकेश गानू यांनी केला आहे.

सुनावणी इन कॅमेरा करा

प्रदीप कुरुलकर याची केस इन कॅमेरा चालवावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. सुनावणी दरम्यान उपलब्ध असलेली माहिती खुली झाल्यास देशाच्या सार्वभौमत्वाला आणि हिताला बाधा पोचेल, त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी इन कॅमेरा करावी, अशी मागणी केली. त्याला आरोपीच्या वकिलांनी हरकत घेतली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.