पुण्यात थरार, पतीने पत्नीला लॉजवर नेले अन्… मग मद्याच्या नशेत…

Pune Crime News: कृष्णाने एका मित्रांसोबत मद्य प्राशन केले. त्यावेळी त्याने मित्राला सांगितले की त्याने त्याच्या पत्नीचा खून केला आहे. मित्राला हे कळताच ते घाबरले. त्यांनी थेट भारती विद्यापीठ पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

पुण्यात थरार, पतीने पत्नीला लॉजवर नेले अन्... मग मद्याच्या नशेत...
Follow us
| Updated on: Jun 16, 2024 | 8:50 AM

पुणे शहरात धक्कादायक घटना उघड झाली आहे. पुण्यात पतीकडून पत्नीला लॉजवर नेऊन चाकूने वार करून तिचा खून करण्यात आला आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ भागातील लॉजवर ही घटना घडली आहे. या प्रकरणात आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काजल कृष्णा कदम (वय २७) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती कृष्णा कदम याच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघांमध्ये घटस्फोटाचे प्रकरण

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काजल आणि कृष्णा यांच्यामध्ये घटस्फोटाचे प्रकरण सुरू होते. या दोघांनी पुन्हा एकत्र राहण्याचा विचार केला होता. त्यामुळे कृष्णाने काजल हिला चर्चेसाठी बोलवले होते. शनिवारी दुपारी ते अश्विनी लॉजमध्ये गेले. त्या ठिकाणी त्यांनी मद्यपान केला. मद्याच्या नशेमध्ये त्यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यानंतर कृष्णाने काजलवर चाकूने वार करून तिचा खून केला. त्यानंतर खोलीला कुलूप लावून तो बाहेर निघून गेला.

मित्रांसमोर उघड केला प्रकार

कृष्णाने एका मित्रांसोबत मद्य प्राशन केले. त्यावेळी त्याने मित्राला सांगितले की त्याने त्याच्या पत्नीचा खून केला आहे. मित्राला हे कळताच ते घाबरले. त्यांनी थेट भारती विद्यापीठ पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ लॉजवर धाव घेतली आणि मृतदेह रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी आरोपी कृष्णा कदम याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली. त्यावेळी त्याने त्याने लॉजवर नेऊन काजलचा खून केल्याचे सांगितले. आरोपीने खून कशासाठी केला हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हे सुद्धा वाचा

4 वर्षाच्या चिमुरडीला चाकूचे चटके, पुण्यात नराधम बापाचे कृत्य

पुण्यात नराधम बापाने अवघ्या ४ वर्षीय बालिकेवर अत्याचार केला. तिच्या हातावर चटके दिले. तिच्या शाळेतील एका शिक्षिकेने तिला विचारले आणि तिने हा सगळा प्रकार सांगितला. आरोपी लहान मुलीशी अश्लील वर्तन करत होता तसेच अनेक वेळा त्याने चाकू गरम करून तिला चटके सुद्धा दिले. सुनील चौहान असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

हे ही वाचा…

पुणे बनले असुरक्षित शहर, मॉर्निंग वॉकला गेले अन् टोळक्यांच्या हल्ल्यात जीव गमावून बसले

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.