पुणे | 3 ऑक्टोंबर 2023 : एका मोटारसायकल चोरी प्रकरणाचा तपास करताना पुणे पोलिसांना दहशतवादी मिळाले. 18 जुलै रोजी पुणे पोलिसांनी महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी या दोघे दहशतवाद्यांना पकडले. त्यावेळी शाहनवाज उर्फ शैफी उज्जमा (ISIS terrorist Shahnawaz) हा फरार झाला होता. त्याला रविवारी रात्री दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. मायनिंग इंजीनिअर असलेला शाहनवाज बॉम्ब बनवण्यात मास्टर होता.
शाहनवाज याच्या पुणे येथील ठिकाणावरुन आयईडी बनवण्याचे समान मिळाले. त्यामुळे तो बॉम्ब बनवण्यात मास्टर असल्याची माहिती समोर आली. त्याने इंजीनिअरींग मायनिंगमध्ये केले. त्यामुळे त्याला स्फोटाकांसंदर्भात बऱ्यापैकी माहिती होती. त्याच्या त्या इंजीनिअरींगमधील ज्ञानाचा वापर त्याने दहशतवादी कारवायांसाठी केला. तसेच इंटरनेटवरुन त्याने यासंदर्भात बरेच शिक्षण घेतले. त्याने बॉम्ब बनवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले. त्याने इतर लोकांसाठी बॉम्ब बनवण्याची कार्यशाळाही घेतली होती. सातारा, सांगली येथील जंगलात त्याने बॉम्बचा स्फोट केला होता.
शाहनवाज याने हिंदू असलेल्या बसंती पटेल हिच्याशी लग्न केले. लग्नानंतर तिने धर्म परिवर्तन केले. तिने इस्लाम धर्म स्वीकारला आणि ती मरियम झाली. दिल्ली पोलिसांनी शाहनवाज याला अटक केली तेव्हा त्याची पत्नी फरार झाली. तिचा शोध सुरु आहे. शाहनवाज हा झारखंडमधील हजारी बाग येथील रहिवाशी आहे.
पुणे पोलिसांनी महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी यांना अटक केली होती. त्यावेळी ते भुरटे चोर असल्याचा पोलिसांचा समज होता. परंतु त्याच्या घराची तपासणी केल्यावर अनेक आक्षेपार्ह साहित्य मिळाले. त्यामुळे ते दहशतवादी असल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा त्या ठिकाणावरुन शाहनवाज फरार झाला होता. 18 जुलै नंतर आता 1 ऑगस्ट रोजी दिल्ली पोलिसांना मिळाला.