Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

pune crime | आमदाराच्या फेसबुक अकाउंटचे क्लोन, पुढे सायबर गुन्हेगारांनी काय केले

Pune Cyber Crime News | राज्यातील आयएएस आणि आयपीएस अधिकारी सायबर गुन्हेगारांच्या रडारवर आले आहेत. या प्रकरणातील गुन्हेगारांचा शोध अजून लागला नाही. आता सायबर भामट्यांनी आमदारांना टर्गेट करणे सुरु केले आहे...

pune crime | आमदाराच्या फेसबुक अकाउंटचे क्लोन, पुढे सायबर गुन्हेगारांनी काय केले
Follow us
| Updated on: Oct 10, 2023 | 11:14 AM

पुणे | 10 ऑक्टोंबर 2023 : राज्यात ऑनलाइन फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. गेल्या काही वर्षांत राज्यातील सायबर पोलिसांकडे फसवणूक केल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ही फसवणूक सर्वसामान्य व्यक्तीची होते असेच नाही तर उच्च शिक्षित लोकही त्यात अडकलेले आहेत. या सायबर भामट्यांनी विविध माध्यमातून फसवणूक करण्याचे काम सुरु केले आहे. कधी ओटीपी घेऊन तर कधी मोबाईल हॅक करुन फसवणूक केली जाते. या भामट्यांच्या रडारवर राज्यातील आयएएस आणि आयपीएस अधिकारी आले होते. आता लोकप्रतिनिधीही आले आहेत. त्यासाठी आमदाराचे क्लोन अकाऊंट तयार करण्यात आले आहे.

कोणाचे केले बनावट खाते

पुणे येथील खडकवासला मतदार संघाचे आमदार भीमराव तापकीर यांचे फेसबुक अकाउंट क्लोन करण्याची करामत सायबर भामट्यांनी केली. सायबर भामट्यांनी आमदार भीमराव तापकीर यांचे बनावट अकाउंट तयार केले. त्यानंतर अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे सुरु केले. त्यामाध्यमातून अनेकांकडे पैश्यांची मागणी केली जात होती. लोकप्रतिनिधींकडून आलेले रिक्वेस्ट असल्यामुळे अनेक जण ती स्वीकरत होते. परंतु त्यानंतर वेगळाच प्रकार घडला.

पुढे अशी केली मागणी

पुणे येथील एका सामाजिक कार्यकर्त्याला चार ते पाच दिवसांपूर्वी आमदार तापकीर यांच्याकडून फेसबुकवरुन फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्यांनी ती स्विकारली. त्यानंतर त्यांना दोन दिवसांनी मेसेंजरवर संपर्क साधला गेला. त्यांचा मोबाईल नंबर मागण्यात आला. पुढे जाऊन जुने फर्निचर विकण्याचे असल्याचे सांगितले. आपल्या ओळखीचे सीआरपीएफमधील अधिकारी सुमित कुमार आहेत. त्यांची बदली झाली आहे. त्यांच्याकडे घरगुती वापराचे जुने फर्निचर उपलब्ध आहे. ते त्यांना विकायचे असल्याचे सांगितले.

हे सुद्धा वाचा

असा उघड झाला प्रकार

सुदैवाने त्या सामजिक कार्यकर्त्यास या प्रकरणात शंका आली. त्यांनी थेट भीमराव तापकीर यांना फोन केला. त्यांना हा सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर आपण फेसबुकवरुन अशी रिक्वेस्ट पाठवली नाही, असे त्यांनी स्पष्ट केल्यानंतर प्रकार उघड झाला. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातील अनेक प्रतिष्ठीत व्यक्तींचे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून पैशांची मागणी केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहे.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.