ललित पाटील प्रकरणात महत्वाची अपडेट, ससूनचे माजी डीन चौकशीच्या फेऱ्यात
Pune Crime News | ललित पाटील पलायन प्रकरणात ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवते याला गुन्हे शाखेकडून अटक दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणी ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांच्या अडचणी वाढणार आहे. पोलीस त्यांची चौकशी करण्याची शक्यता आहे.
प्रदीप कापसे, पुणे, दि. 29 नोव्हेंबर 2023 | पुणे येथील ससून रुग्णालयातील ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात पोलिसांनी धडाकेबाज तपास सुरु केला आहे. पुणे पोलिसांना या प्रकरणात आता ससून रुग्णालयाभोवती चौकशीचा फास आवळला आहे. ललित पाटील पलायन प्रकरणात ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवते याला गुन्हे शाखेकडून अटक दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली. त्यानंतर येरवडा कारागृहातील कर्मचाऱ्याला पुणे पोलिसांकडून अटक केली. मोईस शेख असे येरवडा कारागृहाच्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. आता या प्रकरणाची चौकशी ससून रुग्णालयाचे माजी डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यापर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.
ललित पाटील ड्रग्स प्रकरण
ड्रग्ज प्रकरणात आरोप करण्यात आलेल्या ससूनच्या माजी डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलीस चौकशी करणार आहे. यामुळे आता डॉक्टर संजीव ठाकूर यांच्या अडचणी वाढणार आहे. ससूनमधील कर्मचारी महेंद्र शेवते याच्या अटकेनंतर वार्डबॉयचीही चौकशी झाली होती. आता संजीव ठाकूर यांची चौकशी होणार आहे.
आमदार रवींद्र धंगेकर यांचे आंदोलन
काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी आंदोलन केले. पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. त्यांनी ललित पाटील प्रकरणात ससूनचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यावर कारवाईची मागणी त्यांनी केली. तसेच शिवाय ड्रग्ज प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आमदार धंगेकर यांनी केली.
येरवडा कारागृहातील कर्मचारी अटकेत
ससून रुग्णालयातील शिपायानंतर येरवडा कारागृहातील कर्मचाऱ्याला पुणे पोलिसांकडून अटक केली आहे. मोईस शेख असे येरवडा कारागृहाच्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ललित पाटील याला पळून जाण्यास शेखने मदत केली होती. ललित हा ससून रुग्णालयात होता तेव्हा त्याने शेख याचा मोबाईल वापरला होता. शेख याच्या मोबाईलवरूनच ललित पाटील याने भूषण पाटील, अभिषेक बलकवडे याला फोन केले होते. ललित याने शेख याचा मोबाईल वापरून पळून जाण्याचा डाव आखला होता.