CCTV : कपाटाच्या आवाजाने जाग आली आणि घरच्या लक्ष्मीने घेतलं दुर्गेचं रुप, पाहा चोरीचा थरार

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुण्यात कॉलनीत चोरीचा प्रयत्न महिलेच्या धाडसापुढे फसला! कसा? पाहा व्हिडीओ

CCTV : कपाटाच्या आवाजाने जाग आली आणि घरच्या लक्ष्मीने घेतलं दुर्गेचं रुप, पाहा चोरीचा थरार
चोरीचा प्रयत्न फसलाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 26, 2022 | 10:36 AM

पुणे : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चोरी करण्याचा प्रयत्न पुणे जिल्ह्यातील (Pune News) मावळ (Maval Crime) येथे फसला. एका कॉलनीतील घरात शिरुन 5 चोरट्यांनी चोरीचा कट रचला होता. पण कपाटाचा आवाज झाल्यानं घरातील महिलेला जाग आली. तिने आवाजाच्या दिशेने जात चोरांचा थरारक पाठलाग केला. इतक्यात चोरांनी तिथून धूम ठोकली. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही (Maval Theft CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला. त्यामुळे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ करण्याचं सोरांनं स्वप्न गृहिणीच्या सतर्कतेमुळे अधुरं राहिलंय.

5 चोर घरात शिरले, पण…

मावळमधील तळेगाव दाभाडे येथे कडोलकर कॉलनी आहे. या कॉलनीत धनंजय वाडेकर आपल्या पत्नीसह राहतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वाडेकर यांच्या घरामध्ये चोरी करण्याच्या इराद्याने चोर शिरले. पण चोरी करताना झालेल्या कपाट्या आवाजामुळे चोरीचा बेत फसला.

हे सुद्धा वाचा

एकूण पाच चोर धनंजय यांच्या घरात शिरले होते. चोरांना कपाड उघडण्याचा प्रयत्न केला. कपाटाच्या आवाजाने धनंजय वाडेकर यांच्या पत्नीला जाग आली. त्याने कपाटाचा आवाजा ज्या दिशेने आला, त्या दिशेनं त्या आवाज करत गेल्या. चोर दिसताच त्या पाठलाग करुन लागल्या. मात्र चोरांनी तिथून धूम ठोकली.

पाहा व्हिडीओ :

सुदैवानं वाडेकर यांच्या घरामधील कोणतेही सोन्याचे दागिने, रोख रक्कम चोरीला गेली नाही. त्यामुळे वाडेकर कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला. वाडेकर यांच्या धाडसामुळे चोरांना घाम फुटला होता. सध्या मावळमध्ये वाडेकर यांच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होतंय.

दरम्यान, या घटनेप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांना कळवण्यात आलं आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु केलाय. अधिक तपास पोलिसांकडून केला जातोय. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरातील इतर नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहनही केलं जातंय.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.