Pune drown : मित्रांसोबत पोहायला गेला, पाय गाळात रुतल्याने बुडाला! मावळमध्ये तरुणाचा दुर्दैवी अंत

Maval Drown News : किसन बोराडे (Kisan Borade) हा डोणे येथे पोहण्यासाठी गेला होता. ज्या ठिकाणी तो पोहत होता, तेथील पाण्यातील गाळाचा त्याला अंदाज आला नाही. किसनचा पाय गाळात रुतला गेला आणि त्यामुळे तो पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडला.

Pune drown : मित्रांसोबत पोहायला गेला, पाय गाळात रुतल्याने बुडाला! मावळमध्ये तरुणाचा दुर्दैवी अंत
किसन बोराडे, बुडून मृत्यू झालेला तरुणImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 8:42 AM

पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ (Maval Taluka, Pune District) तालुक्यात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या मृत्यूने (Pune Drown death) त्याच्या कुटुंबीयांना तर मोठा धक्का बसलाच. शिवाय ज्या मित्रांसोबत हा तरुण पोहण्यासाठी गेला होता, त्या मित्रांच्याही पायाखालची जमीन सरकलीय. एक तरुण बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनीही (Pune Police news) रेस्क्यू टीमसह घटनास्थळ गाठलं. त्यानंतर तरुणाच्या मृतदेहाचा शोध घेण्यात आला. अखेर तासाभराच्या प्रयत्नांनंतर तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोहण्याचा आनंद घेण्यासाठी म्हणून गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्यानं पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात हळहळ व्यक्त केली जातेय. पोलिसांनी याप्रकरणी मृत्यूची नोंद करुन घेत पुढील तपास सुरु केलाय.

कुटुंबीयांचा आक्रोश, मित्रांना धक्का

बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव किसन शशिकांत बोराडे अ्सं आहे. किसन आपल्या चार मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता. मावळ तालुक्यामधील डोणे येथे पोहण्यासाठी गेला असता त्याचा बुडून मृत्यू झाला. किसन बुडाल्यानं त्याच्या मित्रांचीही घाबरगुंडी उडाली होती. आपल्या घरातील तरुण मुलाचा बुडून मृत्यू झाल्याचं समजल्यानंतर बोराडे कुटुंबीयांनी केलेला आक्रोशही काळीज पिळवटून टाकणारा होता.

हे सुद्धा वाचा

का बुडाला?

किसन बोराडे हा डोणे येथे पोहण्यासाठी गेला होता. ज्या ठिकाणी तो पोहत होता, तेथील पाण्यातील गाळाचा त्याला अंदाज आला नाही. किसनचा पाय गाळात रुतला गेला आणि त्यामुळे तो पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडला. या घटनेची माहिती वडगाव मावळ पोलिसांनी मिळताच त्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली.

वन्यजीव रक्षक मावळ संस्थेला पाण्यात बुडालेल्या किसनचा मृतदेह शोधण्यासाठी पाचारण करण्यात आलं. वन्यजीव रक्षकची टीम आवश्यक साधन सामग्रीसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी शोधमोहीत सुरु केली. जवळपास तासाभराच्या शोधानंतर किसनाच मृतदेह हाती लागला.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.