कॉलेजमधील आठ मित्र वर्षाविहारासाठी आले, दोघे वाहून गेले… बचाव पथकाने ४८ तासांच्या शोधानंतर…

Pune News : इंद्रायणी नदीवरील कुंडमाळा या ठिकाणी वर्षाविहारासाठी काही मित्र आले होते. पाण्याचा प्रवाहाचा अंदाज न घेता चौघे जण पाण्यात उतरले. मग प्रवाहाबरोबर वाहू लागले. मित्रांना बचावसाठी प्रयत्न सुरु केले. परंतु...

कॉलेजमधील आठ मित्र वर्षाविहारासाठी आले, दोघे वाहून गेले... बचाव पथकाने ४८ तासांच्या शोधानंतर...
Follow us
| Updated on: Aug 26, 2023 | 2:01 PM

रणजित जाधव, मावळ, पुणे | 26 ऑगस्ट 2023 : श्रावण महिना आता सुरु झाला आहे. राज्यात मुसळधार पाऊस नसला तरी काही ठिकाणी कश्रावण सरी सुरु आहेत. या श्रावण सरींचा आनंद घेण्यासाठी आठ ते नऊ मित्र इंद्रायणी नदीवरील कुंडमाळा या ठिकाणी वर्षाविहारासाठी आले. पाण्याचा प्रवाहाचा अंदाज न घेता चौघे जण पाण्यात उतरले. मग प्रवाहाबरोबर वाहू लागले. दोघे जणांना त्यावेळी वाचवण्यास यश आले. पण इतर दोघे वाहून गेले. २४ ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती. बचाव पथकाने तब्बल ४८ तास शोध मोहीम राबवली.

कसा घडला प्रकार

चिंचवड येथील श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा महाविद्यालयामधील आठ, नऊ मित्रांनी वर्षा विहारीसाठी सहलीचे आयोजन केले होते. हे सर्व जण लोकलने बेगडेवाडी येथे आले. त्यानंतर कुंडमळा येथे पोहचले. यावेळी त्यांच्यापैकी चार जण पाण्यात उतरले. परंतु पाण्याचा प्रवाहाचा अंदाज त्यांना आला नाही. ते पाण्याबरोबर वाहू लागताच दोघांना वाचवले गेले. परंतु अनिकेत वर्मा (वय 17) आणि अशोक गुलाब चव्हाण (वय 17, रा. चिंचवड) पाण्यासोबत वाहून गेले.

हे सुद्धा वाचा

बचाव पथकाकडून शोधकार्य

दोघांचा शोध घेण्यासाठी मावळ वन्यजीव रक्षक टीम आणि लोणावळा येथील शिवदुर्ग रेस्क्यू पथकने मोहीम हाती घेतली. दिवसभराच्या शोध मोहिमेनंतर वाहून गेलेल्या दोन मुलांपैकी अनिकेत वर्मा याचा मृतदेह सापडला. परंतु दुसर्‍या मुलाचा मृतदेह सापडला नव्हता. त्यासाठी रात्री अंधार झाल्यामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा शोध सुरु केला. त्यावेळी अशोक चव्हाण याचाही मृतदेह सापडला.

दोन महिन्यात अनेक घटना

मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे अनेक पर्यटक धोकादायक पद्धतीने पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरत स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत. गेल्या दोन महिन्यात पाण्यात वाहून गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे या ठिकाणी पर्यटनास बंदी करावी, अशी मागणी पुढे येत आहे. प्रशासनाने या संदर्भात त्वरीत लक्ष देऊन उपाययोजना करण्याची गरज आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.