Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील मायलेकाच्या हत्या प्रकरणात पतीच संशयित, सीसीटीव्ही फूटेजमुळे गुंता सुटण्याची चिन्हं

ब्रिझा कार आबीदच चालवत होते, त्यामध्ये कुठल्याही चौथ्या व्यक्तीचा सहभाग नव्हता, असं पोलिसांच्या तपासात स्पष्ट झालं. गाडीत सापडलेले रक्ताचे डाग आलिया यांच्या रक्ताशी जुळले आहेत

पुण्यातील मायलेकाच्या हत्या प्रकरणात पतीच संशयित, सीसीटीव्ही फूटेजमुळे गुंता सुटण्याची चिन्हं
पुण्यात मायलेकाचा मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी आढळला
Follow us
| Updated on: Jun 17, 2021 | 11:32 AM

पुणे : पुण्याच्या वेगवेगळ्या भागात मायलेकाचे मृतदेह (Pune Mother Son Double Murder Case) सापडल्यानंतर पिताच पोलिसांच्या रडारवर आहे. 35 वर्षीय आलिया शेख आणि त्यांचा 7 वर्षांचा मुलगा अयान शेख यांच्या हत्येप्रकरणी 38 वर्षीय पती आबीद शेख मुख्य संशयित आहेत. पिकनिकसाठी घराबाहेर पडलेल्या कुटुंबातील मायलेकाचे मृतदेह सापडल्यानंतर पिताही गायब असल्यामुळे गुंता वाढला होता. मात्र सीसीटीव्ही फूटेजमुळे पोलिसांच्या तपासाला दिशा मिळाली आहे. सोमवारी घडलेली हत्येची घटना मंगळवारी मायलेकाचे मृतदेह सापडल्यानंतर उघडकीस आली होती. (Pune Mother Son Double Murder Case Police looking for Missing Father)

पुण्याच्या वेगवेगळ्या भागात मायलेकाचे मृतदेह

दुहेरी हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आबीद शेख एका खासगी इन्शुरन्स कंपनीत मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. मूळ मध्य प्रदेशातील असलेले हे कुटुंब पुण्यातील धानोरी भागात राहते. चार दिवसांपूर्वी आबीद शेख यांनी पिकनिकला जाण्यासाठी ब्रिझा कार भाड्याने घेतली होती. त्याच रात्री आपण घरी परतणार असल्याचं त्यांनी नातेवाईकांना सांगितलं होतं. मात्र तिघे परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेतली. मंगळवारी सकाळी सासवड गावात आलिया यांचा मृतदेह आढळला. सासवड पोलीस त्या खुनाचा तपास करत असतानाच संध्याकाळी नवीन कात्रज बोगद्यालगत जांभूळवाडी भागात मुलगा अयान शेखही मृतावस्थेत आढळला.

रस्त्यातच मायलेकाची हत्या केल्याचा संशय

दुसरीकडे, आबीद शेख यांनी भाड्याने घेतलेली ब्रिझा कार पुणे-सातारा रस्त्यावर एका चित्रपटागृहासमोर सापडली होती. ब्रिझा कार आबीदच चालवत होते, त्यामध्ये कुठल्याही चौथ्या व्यक्तीचा सहभाग नव्हता, असं पोलिसांच्या तपासात स्पष्ट झालं. गाडीत सापडलेले रक्ताचे डाग आलिया यांच्या रक्ताशी जुळले आहेत. लोखंडी दांड्याने प्रहार करुन आलियाची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे, तर गळा आवळून मुलाचा जीव घेतल्याची माहिती आहे. रस्त्यातच दोघांची हत्या केल्यानंतर दोन ठिकाणी त्यांचे मृतदेह टाकल्याची शक्यता आहे.

पतीने गाडी रस्त्यातच सोडल्याचे सीसीटीव्हीत कैद

सातारा रोडवरील मार्केट यार्ड परिसरात आबीद यांनी गाडी सोडून दिल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे. त्यानंतर ते स्वारगेटच्या दिशेने चालत गेल्याचंही दिसत आहे. शहर सोडण्यासाठी त्यांनी खासगी बस पकडली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. आबीद शेख यांच्या शोधासाठी पोलिसांची सात पथकं रवाना करण्यात आली आहे. विमानतळांवर त्यांचे फोटो पाठवण्यात आले असून ते देशाबाहेर जाऊ नयेत, यासाठी त्यांचा पासपोर्टही निलंबित करण्यात आला आहे.

मूळ मध्य प्रदेशातील कुटुंब

आबीद शेख हे मध्य प्रदेशातील विदिशा येथील सेवानिवृत्त जिल्हा नियोजन अधिकाऱ्याच्या कुटुंबातील आहेत. त्यांचा भाऊ कॅनडामध्ये स्थायिक आहे. महिलेचे माहेर भोपाळमधील आहे. 2007 मध्ये हे जोडपे पुण्यात आले. त्यानंतर लोहेगावच्या चाऱ्होली येथील फ्लॅटमध्ये ते शिफ्ट झाले. आलिया एका खासगी कंपनीत नोकरी करत होती, पण दोन वर्षांपूर्वी आपल्या मुलाला ऑटिझम असल्याचे निदान जोडप्याला झाल्यानंतर तिने नोकरी सोडली.

संबंधित बातम्या :

पुण्यात पुलाखाली मध्यमवयीन महिलेचा मृतदेह सापडला, ओळख पटवण्याचं आव्हान

पुण्याचं कुटुंब पिकनिकला रवाना, सासवडमध्ये आईचा, कात्रजला चिमुकल्याचा मृतदेह सापडला, पती बेपत्ता

(Maharashtra Crime News Pune Mother Son Double Murder Case Police looking for Missing Father)

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.