पुण्यात दर्शना पवारनंतर प्रेम प्रकरणातून आणखी एक हत्या, महाविद्यालयीन युवकास कोयत्याने वार संपवले

Pune Crime News | पुणे शहरात MPSC टॉपर दर्शना पवार हिची प्रेम प्रकरणातून जून महिन्यात हत्या झाली होती. त्या प्रकरणानंतर पुन्हा प्रेम प्रकरणातून मंगळवारी संध्याकाळी युवकाची हत्या झाली. कोयत्याने वार करुन युवकाचा खून करण्यात आला. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी दोन पथके पाठवली आहे.

पुण्यात दर्शना पवारनंतर प्रेम प्रकरणातून आणखी एक हत्या,  महाविद्यालयीन युवकास कोयत्याने वार संपवले
Follow us
| Updated on: Nov 29, 2023 | 8:43 AM

अभिजित पोते, पुणे, दि. 29 नोव्हेंबर 2023 | पुणे शहरात MPSC टॉपर दर्शना पवार हिची प्रेम प्रकरणातून जून महिन्यात हत्या झाली होती. तिचा मित्र तिचा मित्र राहुल हंडोरे याने ही हत्या केली होती. या प्रकरणास काही महिने होत नाही, तोपर्यंत पुणे शहर एका हत्याकांडने हादरले होते. पुण्यात २१ वर्षीय तरुणाची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली आहे. ही हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हा युवक बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. दरम्यान आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत. महेश डोके असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

का झाली हत्या

महेश डोके याचा खून समलैंगिक संबंधातून झाल्याचा पोलिसांना संशय आहे. महेश वाघोली येथील एका महाविद्यालयमध्ये शिकत होता. तो वाढीबोलाही येथे एका होस्टेलमध्ये राहत होता. मंगळवारी सायंकाळी बकोरी रोड वाघोली येथे त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. त्यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात भरती करण्यात आली. त्याच्या प्रकृतीची परिस्थिती पाहून त्याला ससून रुग्णालयात पाठवण्यात आले. परंतु ससून रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

महेश बीबीएच्या शेवटच्या वर्षांत

महेश डोके हा बीजीएस कॉलेज वाघोली येथे बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. तो वाढेबोलाही येथे एका होस्टेलमध्ये राहत होता. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला. प्राथमिक अंदाजानुसार ही हत्या समलैंगिक संबंधातून झाल्याचा दाट संशय आहे. परंतु नेमक्या कारणाचा अजूनही शोध घेत आहोत. आरोपीच्या शोध घेण्यासाठी दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जून महिन्यात एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेली दर्शना पवार हिची हत्या तिच्या मित्रानेच केली होती. लग्नास नकार दिला म्हणून ही हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पेरुगेट पोलीस चौकीजवळ युवतीवर कोयत्याने वार करण्याचा प्रकार घडला होता.

'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.