पुणे शहरात कोयता गँगची दहशत, दुकानात घुसून व्यापाऱ्यावर केला हल्ला

Pune Cirme News : पुणे शहरात गुन्हेगारी वाढली आहे. कोयता गँगचा धुमाकूळ सुरु आहे. या गँगकडून कधी गाड्यांची तोडफोड केली जाते तर कधी हल्ले केले जातात. पुणे पोलिसांचे सर्व उपाय कमी पडताना दिसत आहे.

पुणे शहरात कोयता गँगची दहशत, दुकानात घुसून व्यापाऱ्यावर केला हल्ला
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलांशी अश्लील वर्तन करणारा अटक
Follow us
| Updated on: Jul 09, 2023 | 2:00 PM

रणजित जाधव, पिंपरी चिंचवड : पुणे शहर अन् परिसरात कोयता गँगचा बिमोड करण्यासाठी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर उपाययोजना सुरु आहेत. कोयात गँगचा म्होरक्याला अटक केली गेली आहे. काही गुन्हेगारांवर मकोकाची कारवाई करण्यात आली आहे. काही जणांना हद्दपार करण्यात आले आहे. कोयताची विक्री करताना आधारकार्डची सक्ती करण्यात आली आहे. कोम्बिंग ऑपरेशननंतर गुन्हेगार मोकाट असल्याचे स्पष्ट आहे. कारण रविवारी पिंपरी चिंचवडमध्ये कोयता गँगने चांगलीच दहशत निर्माण केली.

कोयता गँगचा हल्ला

पिंपरी चिंचवडमध्ये कोयता गँगची दहशत निर्माण झाली आहे. दुकानात घुसून व्यापाऱ्यावर हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला कोयता गँगने केला आहे. तसेच दुकानासह परिसरातील वाहनांची तोडफोड केली आहे. या प्रकारात व्यापारी जखमी झाला आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. आता चिखली पोलिसांकडून समाजकंटकाचा शोध सुरू करण्यात आला आहे.

आयुक्त रस्त्यावर

पुणे शहर अन् परिसरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस आयुक्त, उपायुक्त रस्त्यावर उतरले आहेत. पुणे परिसरात ‘कोम्बिंग’ ऑपरेशन राबवण्यात आले. या ऑपरेशनमुळे अनेक गुन्हेगारांना अटक झाली. काहींना नोटीस देण्यात आली. सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली गेली. पुणे पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी शुक्रवारी मध्यरात्री शहरातील अनेक पोलिस ठाण्यांना भेटी दिल्या. त्यानंतर पोलीस अधिकारीही दक्ष झाले. परंतु कोयता गँगची दहशत कमी होत नाही.

हे सुद्धा वाचा

पुणे शहरात रस्त्यावर सदाशिव पेठेत एका तरुणीवर कोयत्याने हल्ला झाला होता. प्रेम प्रकरणावरुन पेरुगेट पोलीस चौकीजवळ हा हल्ला झाला. त्यानंतर पोलीस चांगलेच आक्रमक झाले. अनेक गुन्हेगारांवर कारवाई झाली. दुसऱ्या बाजूला पोलीस आयुक्तांनी काही अधिकारी अन् कर्मचाऱ्यांचे निलंबनसुद्धा केले.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.