पुणे पोलीस आक्रमक, या कुख्यात गुंडावर तिसऱ्यांदा मोक्का, कारण काय?
Pune Crime News: नाना गायकवाड यांच्यावर गेल्या दहा वर्षांत अनेक गुन्हे दाखल झाले आहे. खून, दरोडा, एखाद्याच्या मृत्यूस जबाबदार, गंभीर दुखापत असे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्याने परिसरात स्वत:ची टोळी निर्माण केली. या टोळीच्या माध्यमातून तो गुन्हेगारी कारवाया चालवत होता.
लोकसभा निवडणुकी दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांनी जोरदार पावले उचलली आहेत. पुणे शहर आणि परिसरातील गुंडांवर कठोर कारवाई पुणे पोलिसांनी सुरु केली आहे. पुण्यातील कुख्यात सावकार आणि गुंड नानासाहेब गायकवाड आणि त्याच्या टोळीविरुद्ध पुणे पोलिसांनी तिसऱ्यांदा मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई केली आहे. यापूर्वी नाना गायकवाड आणि त्याच्या टोळीला दोन वेळा पुणे पोलिसांनी मोक्का लावला होता. आता नाना गायकवाडसोबत त्याची पत्नी नंदा गायकवाड त्याचा मुलगा गणेश गायकवाड यांच्यावर पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे. यापूर्वी दोन वेळा झालेल्या कारवाईनंतर अनेक दिवस या कायदानुसार ही टोळी येरवडा कारागृहात होती.
का केली कारवाई
पुणे येथील औंधमधील एनएसजी आय.टी. पार्क येथे नवीन इमारत नाना गायकवाड याच्या मालकीची आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याचे पूर्णत्वाचे दाखल्यासह भोगवटापत्र मिळण्यासाठी विहीत कागदपत्रांसह पुणे महानगरपालिकेकडे अर्ज करणे आवश्यक होते. मात्र पुणे महानगरपालिकेचे भोगवाटापत्रा शिवाय नाना गायकवाड याने ही जागा स्टेट बँक ऑफ इंडियाला व्यावसायिक वापरासाठी दिली होती.
या जागेचा वापर थांबविण्याबाबत कायदेशीर कारवाई करण्याची नोटीस महापालिकेच्या वतीने गायकवाडला दिली होती आणि नंतर महापालिकेने याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांकडे गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल केला होता. पुढे पोलिसांनी मोक्का कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ पोलिसांकडे पाठवत ही कारवाई केली आहे.
दहा वर्षांत अनेक गुन्हे
नाना गायकवाड यांच्यावर गेल्या दहा वर्षांत अनेक गुन्हे दाखल झाले आहे. खून, दरोडा, एखाद्याच्या मृत्यूस जबाबदार, गंभीर दुखापत असे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्याने परिसरात स्वत:ची टोळी निर्माण केली. या टोळीच्या माध्यमातून तो गुन्हेगारी कारवाया चालवत होता. स्वतःला फायदा मिळण्यासाठी अनेक निहमबाह्य कृत्य नाना गायकवाड आणि त्याच्या टोळीचे सुरु होते. यामुळे पुणे पोलिसांनी पुन्हा तिसऱ्यांदा त्याच्यावर मोक्कानुसार कारवाई केली. पुणे शहर पोलीस दलाचे अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी ही कारवाई केली.