Pune News : उत्तेजक इंजेक्शन विकणाऱ्यांवर मोठी कारवाई, प्राणघातक ठरतात इंजेक्शन

Pune Crime News : पुणे परिसरात उत्तेजक इंजेक्शनची विक्री सरार्स होत होती. पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळाल्यावर मोठी कारवाई करत इंजेक्शन विकणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. आरोपींकडून मोठा साठाही जप्त करण्यात आला आहे.

Pune News : उत्तेजक इंजेक्शन विकणाऱ्यांवर मोठी कारवाई, प्राणघातक ठरतात इंजेक्शन
Follow us
| Updated on: Aug 19, 2023 | 1:53 PM

रणजित जाधव, मावळ, पुणे | 19 ऑगस्ट 2023 : पुणे परिसरात अंमलीपदार्थ विक्रीची अनेक प्रकरणे यापूर्वी उघड झाली आहे. आता पुणे परिसरात उत्तेजक इंजेक्शनची विक्री होत होती. मेफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शन हे इंजेक्शन बॉडी बिल्डींग किंवा नशा करण्यासाठी वापरले जात होते. पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळाली. त्यानंतर मावळातील शिरगावमध्ये उत्तेजक इंजेक्शन विकणाऱ्या दोघांना अटक केली. शिरगाव पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपींकडून १४५ इंजेक्शनच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.

काय वापर होत होता

मेफेनटरमाईन सल्फेट नावाचे हे इंजेक्शन वापण्यास बंदी आहे. परंतु उत्तेजक इंजेक्शन म्हणून त्याचा वापर नशेखोर करतात. हे इंजेक्शन बॉडी बिल्डिंग करण्यासाठी तसेच काही जण नशा करण्यासाठी वापरतात. परंतु हे घातक प्रकारचे इंजेक्शन आहे. हे टोचल्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू देखील होण्याची शक्यता असते. तसेच या इंजेक्शनचे शरीरावर दुष्परिणाम होतात.

कोणाला केली अटक

सुमित पिल्ले आणि चैतन्य कुऱ्हाडे हे दोघे उत्तेजक इंजेक्शनची विक्री करत होते. या दोघांना शिरगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून इंजेक्शनच्या साठ्यासोबत आणि काही प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आलाय. या प्राणघातक इंजेक्शनची विक्री ते दोघे काही युवकांना करत होते. पोलिसांनी या दोघांना रंगेहात पकडून त्यांच्या ताब्यातील लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

हे सुद्धा वाचा

चरसचा साठाही जप्त

दापोली तालुक्यातील हर्णे नवानगर येथे समुद्रकिनाऱ्यावरून चरसचा साठा मिळाला आहे. सुमारे आठ किलो हे चरस असून त्याची किंमत 32 लाख रुपये आहे. मागील आठवड्यात 69 लाख रुपयांचे चरस सापडले होते. त्यानंतर हा दुसरा प्रकार आहे. हे चरस अरबी समुद्रातून वाहून आले असण्याची शक्यता आहे. यामुळे पोलिसांनी आणि कस्टम विभागाने परिसरात शोधमोहीम सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वी मुरुड कर्देदरम्यान चरसची पाकिटे मिळाली होती. त्यानंतर गुजरातच्या समुद्रकिनारी चरस मिळाले होते. ही सर्व पाकिटांमध्ये असणारा अंमली पदार्थ हा एकाच प्रकारचा आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.