TET scam 2018 | टीईटी परीक्षा घोटाळा; पुणे पोलिसांनी अटक केले सुखदेव डेरे कोण?
सुखदेव डेरे 2014 पासून औरंगाबाद बोर्डाचे विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत होते. उपसंचालक पदी कार्यरत असताना जवळपास 25 ते 50 कनिष्ठ महाविद्यालयांना नियमबाह्य मान्यता दिली होती.
पुणे- आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी भरती घोटाळ्यानंतर आता पुणे पोलिसांनी2018 चा शिक्षक पात्रता भरती घोटाळा उघड केला आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदचे माजी आयुक्त सुखदेव डेरे (Former Commissioner of Maharashtra State Examination Council Sukhdev Dere) यांना अटक केली आहे. 2018 मध्ये टीईटीची परीक्षा (TET Exam)नियंत्रक म्हणून सुखदेव डेरे कार्यरत होते. याकाळात त्यांनी ओमआरमध्ये मार्क भरून , विद्यार्थ्यांना बनावट प्रमाणपात्र वाटतं घोटाळा केल्याचे उघड झाले आहे. सुखदेव डेरे हे2012पर्यंत उपसंचालक तर त्यानंतर 2014पासून औरंगाबाद बोर्डाचे विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत होते. आयुक्तन म्हणू कार्यरत असताना गैर कारभाराप्रकरणी त्यांचे निलंबनही करण्यात आले होते.
डेरेवर यापूर्वीही झाली होती कारवाई
सुखदेव डेरे हे शिक्षण उपसंचालक म्हणून कार्यरत असताना अनेक कनिष्ठ महाविद्यालयांना नियमबाह्य पद्धतीनं मान्यता दिल्या प्रकराणीही डेरे यांचे निलंबन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर शिस्तभंग, गैरवर्तणुकीसंदर्भात ठपका ठेवण्यात आला होता. सुखदेव डेरे यांनी उपसंचालकपदी कार्यरत असताना जवळपास 25 ते 50 कनिष्ठ महाविद्यालयांना नियमबाह्य मान्यता दिली होती. या महाविद्यालयांना आधीच्या शिक्षण उपसंचालकांनी अपात्रठरवले होते.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदचे निलंबित आयुक्त तुकाराम सुपे व माजी आयुक्त सुखदेव डेरे यांनी संगनमताने हा घोटाळा केल्याचे समोर आले आहे. टीईटी परीक्षेत घोटाळा केलेल्या आरोपीनीची संख्या आता पाचवर पोहचली आहे. यामध्ये अजूनही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे . डेरे याला अटक केल्यानं त्याच्याकडून आणखी माहिती हाती लागले. लागल्यानंतर प्रकरणाची व्याप्ती उघडकीस येण्यास मदत होणार आहे.
बीड व बंगळुरूमधून दोघांना अटक दुसरीकडं आरोग्य विभागाच्या गट क आणि ड पदाच्या पेपर फुटी प्रकरणी बीड जिल्ह्यातील वडझरी गावातून संजय शाहूराव सानप (40 रा) याला अटक केली आहे. सानप याचा पेपर फुटतीच्या प्रकरणात हात असल्याचे समोर आले आहे. तसेच संजय सानप हा बीड जिल्हा युवा मोर्चाचा माजी अध्यक्ष असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाता जी ए टेक्नॉलॉजी कंपनीच्या प्रमुख अश्विन कुमारलाही बंगळुरूमधून अटक करण्यात आली आहे. जी ए टेक्नॉलॉजी2017 ते 2020 पर्यंत परीक्षा घेण्याचे कंत्राट होते.
Badshah Malik | देशातील सर्वात मोठा रक्तचंदन तस्कर जाळ्यात, बादशाह मलिक मुंबईत जेरबंद
Prakash Ambedkar | शिवनेरी बसेस कुणाच्या मालिकीची आहेत?, प्रकाश आंबेडकरांचा सवाल