Pune Porsche Accident : रक्ताचे नमूने बदलण्यासाठी डॉक्टरास मिळाले तीन लाख रुपये
Pune Porsche Accident : ससूनमध्ये उंदीर चावल्यामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचे प्रकरणही गाजले होते. त्या प्रकरणात डॉ अजय तावरे यांना पदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर देखील डॉ. तावरे यांनी कल्याणी नगर अपघात प्रकरणातील आरोपीला वाचवण्याचे धाडस करत ब्लड सॅम्पल बदलले.
डॉक्टर, तुम्हीसुद्धा…असे म्हणण्याची वेळ पुणे येथील कल्याणीनगर अपघातानंतर आली आहे. आपल्याकडे डॉक्टरांना ईश्वराचा दर्जा दिला जातो. सर्वच रुग्णाचा डॉक्टरांवर शंभर टक्के विश्वास असतो. परंतु कधीकाळी डॉक्टरी व्यवसायाला काळीमा फासण्याच्या घटना उघड होत असतात. पुणे शहरातील अपघात प्रकरणात दोन जणांचा मृत्यू झाला. परंतु डॉक्टरांना ती पैसे कमवण्याची संधी वाटली. चक्क ब्लड सॅम्पल बदण्यासाठी तीन लाख रुपये घेतल्याची माहिती समोर आली आहे. ससून रुग्णालयातील सीएमओ डॉ. श्रीहरी हळनोर याने रक्ताचे नमूने पहिल्यांदा घेतले. त्यासाठी त्याला तीन लाख रुपये मिळाल्याची माहिती समोर आली आहे. रक्ताचे नमूने बदलण्याच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी डॉ. श्रीहरी हळनोर आणि डॉ. अजय तावरे यांना अटक केली.
…तर केसची दिशाच बदलली असती
पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांना अटक केली. हा अपघात झाल्यानंतर अल्पवयीन आरोपीची पोलिसांनी सकाळच्या वेळेत वैद्यकीय तपासणी करून घेतली. त्यावेळी त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. ससूनमध्ये त्यावेळी ड्युटीवर असलेले सीएमओ डॉ. श्रीहरी हळनोर आणि डॉ. अजय तावरे यांनी हे ब्लड सॅम्पल घेतले. परंतु त्यांनी हे सॅम्पल बदलल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. थेट रक्तच बदलल्यामुळे या केसची दिशाच बदलण्याची शक्यता होती. परंतु पोलिसांनी घेतलेल्या दुसऱ्या सॅम्पलमुळे हा प्रकार उघड झाला.
ससून रुग्णालय आणि वाद
पुण्यातील ससून रुग्णालय वादाचे केंद्र बनले आहे. ड्रग्स माफिया ललित पाटील याच रुग्णालयातून फरार झाला होता. या प्रकरणात रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांचा कथित सहभाग उघड झाला होता. तसेच रुग्णालयाती इतर काही कर्मचाऱ्यांना अटक झाली होती.
डॉ.संजीव ठाकूर यांचा मुलाचे प्रकरण उघड झाले होते. यानंतर ससूनमध्ये उंदीर चावल्यामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचे प्रकरणही गाजले होते. त्या प्रकरणात डॉ अजय तावरे यांना पदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर देखील डॉ. तावरे यांनी कल्याणी नगर अपघात प्रकरणातील आरोपीला वाचवण्याचे धाडस करत ब्लड सॅम्पल बदलले.
याने पुरवले होते पैसे
पुणे पोलिसांनी केली आणखी एकाला अटक केली. अतुल घटकांबळे नामक व्यक्तीला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी त्याने पैसे पुरवले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.