पुणे : पुणे शहरात कोयता गँगचा धोका वाढला आहे. कोयता गँगचा धुमाकूळ सुरु आहे. पोलीस विविध पद्धतीने कारवाई करत गुन्हेगारांवर वचक निर्माण करत आहे. अनेक गुन्हेगारांवर मकोका लावण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवले. यावेळी १८०० पेक्षा जास्त गुन्हेगारांची यादी तयार करुन झाडाझडती घेतली. १५० पेक्षा जास्त जणांना अटक केली आहे. आता पोलिसांनी अजून एक मोठा निर्णय घेतला. पोलिसांनी फरार गुन्हेगारास चांगलाच धडा शिकवला आहे.
कोयता असो किंवा इतर गुन्हे करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी धडा शिकवणे सुरु केले आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात मंगेश अनिल माने ऊर्फ मंग्या (२६) याने एकावर खुनी हल्ला केला होता. परंतु गेल्या तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत तो फरार होता. पुणे पोलिसांनी आरोपीला शोधून काढले. त्याची “परेड” काढण्यात आली. शहरातून काढलेल्या त्याच्या वरातीमुळे गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. सर्वसामान्य लोकांनी या प्रकाराचे स्वागत केले आहे.
मंगेश अनिल माने ऊर्फ मंग्या (२६) हा आरोपी खून करुन फरार झाला होता. त्याच्यावर मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या साथीदारांना अटक केली होती. मात्र, मंग्या फरार झाला होता. अखेर त्याला अटक करण्यात आली
पुणे पोलिसांनी गेल्या आठवड्याभरापासून धडक कारवाई सुरु केली आहे. पुण्यात वाहनांची तोडफोड करुन नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांची यादी पोलिसांनी तयार केली. त्यानुसार सुमारे १८०० जणांची झाडाझडती घेतली. त्यातील १५० जणांना अटक केली.