पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांच्या घटस्फोटासंदर्भात पुणे पोलिसांचा दहा पानांचा अहवाल, त्या अहवालात म्हटले काय?
pooja khedkar: पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांच्या घटस्फोटासंदर्भात केंद्र सरकारने अहवाल सादर करण्याये आदेश दिले होते. त्यानंतर दहा पानांचा हा अहवाल पुणे पोलिसांनी तयार करुन राज्य सरकारकडे गुरुवारी पाठवला आहे. त्यात २०१० मध्ये कुठल्याही अटी शर्थीशिवाय घटस्फोट झाल्याचे म्हटले आहे.
प्रशिक्षणार्थी वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांच्या घटस्फोटासंदर्भात केंद्र सरकारने अहवाल सादर करण्याये आदेश दिले होते. त्यानंतर दहा पानांचा हा अहवाल पुणे पोलिसांनी तयार करुन राज्य सरकारकडे गुरुवारी पाठवला आहे. त्यात २०१० मध्ये कुठल्याही अटी शर्थीशिवाय घटस्फोट झाल्याचे म्हटले आहे. पूजा खेडकर यांना ओबीसी कोट्यातून अर्ज करता यावे, त्यांना नॉन क्रिमिलेअरचा लाभ मिळावा, यामुळे हा घटस्फोट दाखवल्याचा आरोप होत होता. १० पानांच्या या अहवालात घटस्फोटाबाबतच्या कायदेशीर बाबीच्या नोंदी आहेत. त्यामुळे या अहवालानंतर घटस्फोटामागील गूढ उलघडणार आहे.
काय आहे प्रकरण
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई-वडीलांचे उत्पन्न कोट्यवधींमध्ये आहेत. त्यांचे वडील दिलीप खेडकर यांनी नुकतीच अहमदनगर मतदार संघातून निवडणूक लढवली होती. त्यामध्ये त्यांनी त्यांचे आणि कुटुंबाचे उत्पन्न 40.5 कोटी दाखवले होते. ते स्वत: शासकीय सेवेत वर्ग एक अधिकारी होते. त्यानंतर त्यांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कसे मिळाले? पूजा खेडकर यांची आई मनोरम खेडकर या कोट्यवधी रुपये किंमतीच्या घरात राहतात. त्यांच्याकडे जमीन आहे. मग त्याकाळी क्रिमिलेअरसाठी साडेचार लाखांची मर्यादा होती. त्याने ते प्रमाणपत्र कसे मिळले? दिलीप खेडकर आणि पूजा खेडकर खरंच वेगवेगळे राहतात का? त्यांचा घटस्फोट झाला आहे का? या संदर्भात चौकशी करुन अहवाल देण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले होते.
त्या अहवालात काय?
राज्य सरकारने हे प्रकरणी सीआयडीकडे दिले होते. परंतु या प्रकरणाचा तपास पुणे पोलीस करत असल्यामुळे त्यांच्याकडे मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांच्या घटस्फोटाचा अहवाल देण्याचे काम दिले. अखेरी तो अहवाल पुणे पोलिसांनी तयार करुन राज्य सरकारकडे सादर केला. त्या दहा पानांच्या अहवालात सर्व माहिती दिली गेली आहे.
पूजा खेडकर सर्व बाजून अडचणीत आल्या आहेत. पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर त्यांनी आरोप केले होते. त्याच्या चौकशीसाठी पुणे पोलिसांनी दोन वेळा त्यांना बोलवले. परंतु त्या आल्या नाहीत. त्यानंतर मसूरीमधील लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमीने त्यांचे प्रशिक्षण थांबवून त्यांना 23 जुलै पूर्वी मसूरी येथील अकॅडमीमध्ये पुन्हा हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतु त्या ठिकाणी त्या गेल्या नाहीत. त्यांची आई एका गुन्ह्यात येरवडा कारागृहात आहे. वडिलांची एसीबी चौकशी सुरु आहे.