Tukaram Supe : अबब ! तुकाराम सुपे याचं 2 कोटी 30 लाखांचं घबाड लेकीसह जावयाने लपवलं, पुणे पोलिसांचा सुपेला दणका

पुणे पोलिसांनी तुकाराम सुपेची आणखी चौकशी केली असता त्याला पैसे लपवण्यात त्याची मुलगी कोमल पाटील आणि जावई नितीन पाटील यांनी मदत केल्याचं समोर आलं.

Tukaram Supe : अबब ! तुकाराम सुपे याचं  2 कोटी 30 लाखांचं घबाड लेकीसह जावयाने लपवलं, पुणे पोलिसांचा सुपेला दणका
तुकाराम सुपे
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 9:13 AM

पुणे: पुणे सायबर पोलिसांनी महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) आणि अभिषेक सावरीकर (Abhishek Savarikar) यांच्यासह आणखी एकाला अटक केली होती. सुपेच्या चौकशीनंतर पुणे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात त्यांना 88 लाख रोख आणि सोनं मिळून 89 लाखांचा ऐवज जप्त केला होता. पुणे पोलिसांनी तुकाराम सुपेची आणखी चौकशी केली असता त्याला पैसे लपवण्यात त्याची मुलगी कोमल पाटील आणि जावई नितीन पाटील यांनी मदत केल्याचं समोर आलं. पुणे पोलिसांनी यानंतर त्या दोघांना चौकशीला बोलावलं. यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून चौकशी करुन छापा टाकून 1 कोटी 59 लाखांची रोकड आणि 70 लाखांचं सोनं हस्तगत केलं आहे.

पुणे पोलिसांनी 2 कोटी 30 लाखांचा ऐवज कसा पकडला?

तुकाराम सुपेची मुलगी आणि जावई यांची चौकशी केल्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांच्या आळंदी येथील चऱ्होली घरी छापा टाकला. यामध्ये पोलिसांना 97 हजार रुपये आढळले. यानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा चौकशी केली. नितीन पाटील यानं पैशांची बॅग त्याचा मित्र बिपीनच्या फ्लॅटवर ठेवल्याची कबुली दिली. यानंतर पुणे पोलिसांनी रोकड आणि 70 लाखांचं सोन जप्त केलं.

तुकाराम सुपे याच्यावर निलंबनांची कारवाई

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना महाराष्ट्र नागरी सेवेतील नियमान्वये अटकेच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले आहे. त्यांना शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय पुणे येथील मुख्यालय सोडता येणार नाही, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात सायबर पोलिसांनी एकाला बीड मधून अटक केली. संजय शाहूराव सानप (40 रा. वडझरी, ता.पाटोदा, जिल्हा बीड ) याचा या गुन्हयात सहभाग असल्याचे आढळल्याने त्यास अटक करण्यात आलीय.

इतर बातम्या

Weather Alert : राज्यात हुडहुडी कायम, सांगलीत शेकोट्या पेटल्या, भंडाऱ्यात पारा 9 अंशांवर! 

SSC Exam : दहावीच्या परीक्षेचे अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ; बोर्डाकडून नव्या तारखा जाहीर

Pune Police seized cash and gold of 2 crore 30 lakh from Tukaram Supe daughter and son in law and his friend house

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.