आयटी डिप्लोमा केलेल्या तरुणांनी चीनमधून कागद मागवला अन् पुण्यात सुरु केली बनावट नोटांची छपाई

Pune Crime News | पुणे शहरातील सहा तरुणांनी व्यवसाय सुरु केला. आयटीमध्ये डिप्लोमा केलेल्या या युवकांनी नवीन प्रिंटिंग प्रेस घेतले. त्यानंतर छापाईचा व्यवसाय सुरू केला. व्यवसायात मंदी आली. त्यांचा व्यवसाय चालू लागला नाही. त्यानंतर चीनमधून ऑनलाइन बनावट नोटा छापण्यासाठी कागद मागवला.

आयटी डिप्लोमा केलेल्या तरुणांनी चीनमधून कागद मागवला अन् पुण्यात सुरु केली बनावट नोटांची छपाई
पुणे पोलिसांनी जप्त केलेले मशीन
Follow us
| Updated on: Feb 28, 2024 | 8:58 AM

रणजित जाधव, पुणे | दि. 28 फेब्रुवारी 2024 : पुणे शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. आयटी डिप्लोमा झालेल्या तरुणांनी गुन्हेगारी सुरु केली. व्यवसायात जम बसला नाही, त्यामुळे त्यांनी बनावट नोटांचा कारखाना सुरु केला. आता पिंपरी- चिंचवड पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. या प्रकरणात सहा जणांना पुणे पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. ऑफसेट मशीनवर बनावट नोटा छापत होते. ही नोट हुबेहुब त्यांनी तयार केली. एकूण ७० हजार रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

काय झाला प्रकार

पुणे शहरातील सहा तरुणांनी व्यवसाय सुरु केला. त्यामध्ये एक जण आयटीमध्ये डिप्लोमा केलेला युवक आहे. या युवकांनी नवीन प्रिंटिंग प्रेस घेतले. त्यानंतर छापाईचा व्यवसाय सुरू केला. व्यवसायात मंदी आली. त्यांचा व्यवसाय चालू लागला नाही. त्यानंतर चीनमधून ऑनलाइन बनावट नोटा छापण्यासाठी कागद मागवला. त्या कागदावर 500 रुपयांच्या बनावट नोटा छापण्यास सुरुवात केली. 70 हजारांच्या नोटाही त्यांनी छापल्या. त्या विकत असताना देहूरोड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि अवघ्या टोळीचा पर्दाफाश झाला.

सहा जणांना अटक

पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. या लोकांनी आयटी डिप्लोमा केला होता. आरोपींकडून सत्तर हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्यात. या लोकांनी अजून नोटा चलनात आणल्या की नाही, त्याचा शोध पुणे पोलीस घेत आहेत. या टोळीची पायमुळं आणखी किती खोलवर आहेत याचा तपास पोलीस करतायत.

हे सुद्धा वाचा

या प्रकरणात या टोळीला कोणाची मदत झाली, त्यांनी हुबेहुब नोटा कशा तयार केल्या, यासंदर्भात तपास पोलिसांनी सुरु केली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.