अभिजित पोते, पुणे दि.17 जानेवारी 2024 | पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची हत्या पूर्व वैमानस्यातून झाली आहे. या प्रकरणात आतापर्यंत पंधरा जणांना अटक करण्यात आली आहे. गुंड विठ्ठल शेलार आणि मुन्ना पोळेकर हे या हत्येच्या कटाचे सूत्रधार असल्याचे तपासातून समोर आले आहे. परंतु या प्रकरणात आणखी एका मुख्य सूत्रधार आहे. पुणे पोलीस त्याला अटक करणार आहे. या प्रकरणात विठ्ठल शेलार आणि मारणे टोळीतील रामदास मारणे या दोघांना देखील पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
शरद मोहोळ याची हत्या अपमानाचा बदला घेण्यासाठी झाली. नामदेव कानगुडे याच्या टोळीकडून शरद मोहोळ याची हत्या झाल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर येत आहे. मामा नामदेव कानगुडे याचा केलेला अपमान सहन न झाल्याने भाचा मुन्ना पोळेकरकडून शरद मोहोळ याची हत्या केल्यायाची माहिती समोर आली आहे. तसेच या प्रकरणात गुंड विठ्ठल शेलार सूत्रधार आहे. त्याचा आणि शरद मोहोळ याचा जुना वाद होता. त्यातून मुन्ना पोळेकर आणि विठ्ठल शेलार यांनी हत्येचा कट रचला.
विठ्ठल शेलार याच्यावरती देखील हिंजवडी परिसरात शरद मोहोळ याच्या सांगण्यावरून मोहोळ टोळीने हल्ला केला होता. त्याच्या बदला घेण्यासाठी नामदेव कानगुडे, मुन्ना पोळेकर आणि विठ्ठल शेलार एकत्र आले. त्यांनी शरद मोहोळ याची हत्या केल्याची माहिती समोर आली. अनेक दिवस नामदेव कानगुडे याने शरद मोहोळ याच्या टोळीतच काम केले होते.
शरद मोहोळ हत्या प्रकरणात नामदेव कानगुडे याला आधीच पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. आता शरद मोहोळ प्रकरणी आणखी एका मुख्य आरोपीला पुणे पोलीस अटक करणार आहे. यासंदर्भात महत्वाचे धागेदोरे पोलिसांना मिळाले आहे. नामदेव कानगुडे, विठ्ठल शेलार आणि आणखीन एका आरोपीने एकत्रित बैठक घेत रशरद मोहोळ याच्या हत्येचा कट रचला होता.