pune porsche accident: अपघातानंतर अजित पवार यांनी पोलीस आयुक्तांना फोन केला का ? स्वत: अजित पवार म्हणाले…

pune porsche accident: आमदार सुनील टिंगरे गेले होते. त्यांनी कोणताही दबाव आणला नाही. हे प्रकरण आता जनतेचे प्रकरण झाले आहे. या प्रकरणात चौकशी पारदर्शकपणे करा. कोणाच्या दबावास बळी पडू नका, इतक्याच सूचना आम्ही अधिकाऱ्यांना करत आहे.

pune porsche accident: अपघातानंतर अजित पवार यांनी पोलीस आयुक्तांना फोन केला का ? स्वत: अजित पवार म्हणाले...
अजित पवार
Follow us
| Updated on: Jun 01, 2024 | 10:02 AM

पुणे बड्या बिल्डरच्या मुलाने भरधाव पोर्श कार चालवत १९ मे रोजी अपघात केला होता. त्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणात आतापर्यंत दहा जणांना अटक झाली आहे. त्यात बिल्डर अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल, आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांचा समावेश आहे. आता त्या मुलाची आई शिवाणी अग्रवाल हिला शनिवारी अटक झाली. या प्रकरणात रोज अनेक आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या सर्व प्रकरणात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेसंदर्भात आरोप होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे पोलीस ठाण्यात गेले होते, त्यांनी आरोपींना वाचवण्यासाठी राजकीय दबाव आणला होता, अजित पवार यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना फोन केलो होतो? असे आरोप होत आहेत. त्या सर्व आरोपांवर अजित पवार यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना उत्तर दिले.

आमदारांनी दबाव आणला का?

अजित पवार म्हणाले की, राज्यात सर्वत्र त्या भागातील आमदार एखादी घटना घडल्यानंतर पोलीस ठाण्यात जात असतात. तो त्या ठिकाणी जाऊन पोलिसांना योग्य चौकशी करण्याचा सूचना देतो. त्यानुसार आमदार सुनील टिंगरे गेले होते. त्यांनी कोणताही दबाव आणला नाही. हे प्रकरण आता जनतेचे प्रकरण झाले आहे. या प्रकरणात चौकशी पारदर्शकपणे करा. कोणाच्या दबावास बळी पडू नका, इतक्याच सूचना आम्ही अधिकाऱ्यांना करत आहे.

मी फोन केला नाहीच…

अपघातानंतर पोलीस आयुक्तांना आपण फोन केला नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात फोन केला असता तरी जखमींना मदत तातडीने द्या आणि आरोपींवर कारवाई करा, अशाच सूचना आम्ही देत असतो, असे अजित पवार यांनी सांगितले. यामुळे या प्रकरणात त्यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन केला नाही, असा दावा त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा

पुणे अपघात प्रकरणातील डॉ. अजय तवारे यांची शिफारस मंत्री हसन मुश्रीफ आणि एनसीपी आमदार सुनील टिंगरे यांनी शिफारस केल्याचे समोर आले. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, बदलीची शिफारस आम्ही करतो. परंतु ते नियमात आहे की नाही, हे बघण्याचे काम अधिकाऱ्यांचे आहे. आमचे शिफारस पत्र असते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी नियम पाहून बदली करायला पाहिजे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.