Pune Porsche Accident : आरोप असणारेच करणार ३ लाख घेणाऱ्या डॉक्टरांची चौकशी, “उंदराला मांजराची साक्ष”, माजी IAS अधिकाऱ्याचा हल्ला

Pune Porsche Accident : पोर्श अपघात प्रकरणात ससून रुग्णालयात घडलेला प्रकार गंभीर आहे. या प्रकरणात अडकलेल्या डॉक्टर्सची चौकशी करण्यासाठी इतर गंभीर प्रकरणात अडकलेल्या दुसऱ्या डॉक्टरची नियुक्ती केली आहे.

Pune Porsche Accident : आरोप असणारेच करणार ३ लाख घेणाऱ्या डॉक्टरांची चौकशी, उंदराला मांजराची साक्ष, माजी IAS अधिकाऱ्याचा हल्ला
महेश झगडे यांनी सरकारवर टीका केली.
Follow us
| Updated on: May 28, 2024 | 10:07 AM

पुणे शहरातील बड्या बिल्डरच्या मुलाने केलेल्या “हिट अँड रन” प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहे. १९ मे रोजी घडलेल्या अपघात प्रकरणात आतापर्यंत नऊ जणांना अटक झाली आहे. त्यात अल्पवयीन मुलाचे वडील आणि अजोबा यांच्यासह पुणे ससून रुग्णालयातील डॉक्टरांचा समावेश आहे. सुरुवातीला या प्रकरणात पुणे पोलिसांनी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विरोधक आणि माध्यमांनी जोरदार आवाज उठवला. त्यानंतर राज्य सरकार चांगलेच अडणीत आले आहे. या प्रकरणात ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी तीन लाख रुपये घेतल्याचे उघड झाले. त्या डॉक्टरांची चौकशी करण्यासाठी डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती राज्य सरकार नेमली आहे. परंतु समितीच्या सदस्यांवरच आरोप आहेत, म्हणजे “उंदराला मांजरीची साक्ष” असा हा प्रकार असल्याचा हल्ला माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहून त्यांनी हा हल्ला केला आहे.

आरोप असणारे करणाच चौकशी

अपघातानंतर अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल ससून हॉस्पिटलमध्ये घेण्यात आले. परंतु ते सॅम्पल डॉ. श्रीहरी हळनोर आणि डॉ. अजय तावरे यांनी बदलल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले. या प्रकरणात दोन्ही डॉक्टरांना पुणे पोलिसांनी अटक केली. त्यांच्या चौकशीसाठी आता जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, मुंबईतील डॉक्टर गजानन चव्हाण आणि छत्रपती संभाजीनगरमधील डॉक्टर सुधीर चौधरी यांची समिती नेमली.

हे सुद्धा वाचा

या समितीमधील डॉक्टरांवर आरोप आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनी डॉ. सापळे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. डॉ.सापळे मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असताना तसेच आता जेजे रुग्णालयात अनेक प्रकरणात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आता त्याच भ्रष्टाचाराच्या या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.

महेश झगडे आक्रमक

समितीसंदर्भातील परिपत्रक फेसबूकवर शेअर करत माजी आयएएस अधिकारी महेश झगडे यांनी टीका केली आहे. पोर्श अपघात प्रकरणात ससून रुग्णालयात घडलेला प्रकार गंभीर आहे. या प्रकरणात अडकलेल्या डॉक्टर्सची चौकशी करण्यासाठी इतर गंभीर प्रकरणात अडकलेल्या दुसऱ्या डॉक्टरची नियुक्ती करून “उंदराला मांजरा साक्ष” ही म्हण पुनर्जिवित करण्याचा चंग तर विनोदी वरिष्ठांनी बांधलेला नाही ना? राज्यात या चौकशीसाठी इतर त्रयस्थ व्यक्ती उपलब्ध नसतील तर त्रयस्थांचा दुष्काळ जाहीर करावा, असा हल्ला महेश झगडे यांनी केला आहे.

हे ही वाचा

पुणे अल्पवयीन मुलास वाचवण्यासाठी सिस्टीम केली क्रॅक, जाणून घ्या दहा मुद्दे

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.