पुणे शहरातील सॉफ्टवेअर इंजिनिअर पाकिस्तानच्या संपर्कात, अनेक वर्षांपासून करत होता हा उद्योग

| Updated on: Jul 04, 2023 | 3:48 PM

Pune Crime News : पुणे शहरातील एक अभियंत्यास अटक करण्यात आली आहे. तो पाकिस्तानमधील काही जणांच्या संपर्कात होता. तब्बल २०१८ पासून त्याचा हा उद्योग सुरु होता. अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात आला.

पुणे शहरातील सॉफ्टवेअर इंजिनिअर पाकिस्तानच्या संपर्कात, अनेक वर्षांपासून करत होता हा उद्योग
Follow us on

पुणे : ओडिशा पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) पुणे शहरातील एका सॉफ्टवेअर कंपनीच्या कर्मचाऱ्यास अटक केली आहे. ओटीपी विक्री आणि शेअरिंग घोटाळ्यात त्याचा सहभाग होता. तो पाकिस्ताननी गुप्तहेरांच्या संपर्कात होता. २०१८ पासून त्याचा हा प्रकार सुरु होता. सातारा जिल्ह्यातील असलेला हा व्यक्ती पुणे शहरातील नामांकीत आयटी कंपनीत कार्यरत होता. आता तो पोलिसांच्या ताब्यात आहे.

कोणाला झाली अटक

अभिजीत संजय जांबुरे याला पुणे येथे अटक करण्यात आली. पुणे न्यायालयातून तीन दिवसांची ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला ओडिशामधील भुवनेश्वर येथे नेण्यात आले. जांबुरे याने गुजरातमधील आनंदा येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर तो पुण्यातील एका सॉफ्टवेअर कंपनीत कार्यरत होता.

काय आहे प्रकरण

अभिजीत दीर्घकाळापासून पाकिस्तानच्या दोन गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता. 2018 मध्ये तो फेसबुक मेसेंजरद्वारे पाकिस्तानातील खानकी, फैसलाबाद येथील सय्यद दानिश अली नक्वी यांना भेटला. त्याने आपण चेग या अमेरिकन आयटी कंपनीत फ्रिलॉन्सर म्हणून काम करत असल्याचे सांगितले. अभिजीतने त्याचा युजर आयडी आणि पासवर्ड दानिशला दिला होता. दानिश अभिजीतच्या सल्लानुसार चेगमध्ये काम करत होता, पण कमाई भारतातील अभिजितच्या खात्यात जमा झाली होती. दानिशकडून मिळणाऱ्या या मदतीचा बदला अभिजीतला द्यावा लागला.

हे सुद्धा वाचा

दानिशने फसवले जाळ्यात

दानिशने अभिजीतची ओळख पाकिस्तानातील कराची येथील त्याचा मित्र खुर्रम अब्दुल हमीद याच्याशी करून दिली. खुर्रम हा पाकिस्तानी लष्करात गुप्तचर अधिकारी आहे. त्याचे भारतात मोठे नेटवर्क आहे. मग अभिजीत खुर्रमच्या सूचनेनुसार भारतातील त्याच्या नेटवर्कमधील विविध पीआयओना पैसे ट्रान्सफर करण्याचे काम करु लागला. अभिजीत व्हॉट्सअॅपद्वारे किमान सात पाकिस्तानी नागरिक आणि 10 नायजेरियन नागरिकांशी संवाद सुद्धा साधला आहे.