Police Bharati: लेखी परीक्षेला एक, मैदानी चाचणासाठी दुसरा; पोलीस भरतीत उमेदवारांच्या तोतयागिरीचं बिंग फुटलं

राज्य राखीव पोलिस भरती प्रक्रियेत डमी उमेदवार बसवल्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. लेखी परीक्षेला एक तर शारीरिक चाचणीसाठी दुसराच उमेदवार उभा केल्याचं समोर आलं आहे.

Police Bharati: लेखी परीक्षेला एक, मैदानी चाचणासाठी दुसरा;  पोलीस भरतीत उमेदवारांच्या तोतयागिरीचं बिंग फुटलं
पोलीस भरतीत गैर प्रकार करणाऱ्यांना अटक
Follow us
| Updated on: Dec 25, 2021 | 10:56 AM

पुणे: राज्य राखीव पोलिस भरती प्रक्रियेत डमी उमेदवार बसवल्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. लेखी परीक्षेला एक तर शारीरिक चाचणीसाठी दुसराच उमेदवार उभा केल्याचं समोर आलं आहे. नव्याने स्थापन झालेल्या कुसडगाव मधील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 19 ची पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया दौंड मधील राज्य राखीव पोलीस गट क्रमांक सातच्या मैदानावर लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी सुरू होती. मात्र, भरती प्रक्रिये दरम्यान उमेदवारांचे कागदपत्रं तपासत असताना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर याठिकाणी राहणाऱ्या प्रकाश त्रिभुवन या 27 वर्षीय उमेदवाराच्या जागेवर गजानन ठाकूर हा शारीरिक चाचणी देण्यात साठी डमी उमेदवार उभा केल्याचे कागदपत्रे पडताळणीत लक्षात आलं.

दोघांना अटक

राज्य राखीव पोलीस दलाच्या पोलीस निरीक्षकांनी दौंड पोलीस ठाण्यात डमी उमेदवार आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोनी आरोपींना अटक केली आहे.

कागदपत्रं तपासणी दरम्यान फुटलं बिंग

दौंड येथील राज्य राखीव पोलीस बलाच्या गट क्रमांक 19 च्या पोलीस शिपाई भरतीसाठी शारीरिक चाचणी सुरु होती.यावेळी पोलीस अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची तपासणी करण्यात येत होती. कागदपत्रं तपासणी दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांना बनाव लक्षात आला. यानंतर दौंड पोलीस ठाण्यात त्या उमेदवारांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.

उमदेवारांना गैरप्रकार न करण्याचं आवाहन

गेल्या काही दिवसांपासून पोलीस भरतीसाठीची लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी परीक्षा सुरु आहेत. पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान ठिकठिकाणी उमदेवारांकडून गैर प्रकार करण्यात येत असल्याचं समोर आलं आहे. लेखी परीक्षेदरम्यान ब्ल्यूटुथ चा वापर करण्यात आल्याची उदाहरणं समोर आली  होती. उमदेवारांनी परीक्षा आणि भरती प्रक्रियेदरम्यान गैरप्रकारांपासून दूर राहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

इतर बातम्या:

Omicron : भारतातील ओमिक्रॉनची रुग्णसंख्या 415 वर, महराष्ट्रात सर्वाधिक रुग्णांची नोंद

शंभर दीडशे नाही, पावणे दोनशे कोटी सापडले, नोटा मोजायलाही 13 मशिन्स, कानपूरच्या रेडमध्ये नवं ‘शिखर’!

Pune SRPF Police caught two candidates for malpractice during physical test of Police constable recruitment

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.