पुणे: राज्य राखीव पोलिस भरती प्रक्रियेत डमी उमेदवार बसवल्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. लेखी परीक्षेला एक तर शारीरिक चाचणीसाठी दुसराच उमेदवार उभा केल्याचं समोर आलं आहे. नव्याने स्थापन झालेल्या कुसडगाव मधील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 19 ची पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया दौंड मधील राज्य राखीव पोलीस गट क्रमांक सातच्या मैदानावर लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी सुरू होती. मात्र, भरती प्रक्रिये दरम्यान उमेदवारांचे कागदपत्रं तपासत असताना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर याठिकाणी राहणाऱ्या प्रकाश त्रिभुवन या 27 वर्षीय उमेदवाराच्या जागेवर गजानन ठाकूर हा शारीरिक चाचणी देण्यात साठी डमी उमेदवार उभा केल्याचे कागदपत्रे पडताळणीत लक्षात आलं.
राज्य राखीव पोलीस दलाच्या पोलीस निरीक्षकांनी दौंड पोलीस ठाण्यात डमी उमेदवार आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोनी आरोपींना अटक केली आहे.
दौंड येथील राज्य राखीव पोलीस बलाच्या गट क्रमांक 19 च्या पोलीस शिपाई भरतीसाठी शारीरिक चाचणी सुरु होती.यावेळी पोलीस अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची तपासणी करण्यात येत होती. कागदपत्रं तपासणी दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांना बनाव लक्षात आला. यानंतर दौंड पोलीस ठाण्यात त्या उमेदवारांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून पोलीस भरतीसाठीची लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी परीक्षा सुरु आहेत. पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान ठिकठिकाणी उमदेवारांकडून गैर प्रकार करण्यात येत असल्याचं समोर आलं आहे. लेखी परीक्षेदरम्यान ब्ल्यूटुथ चा वापर करण्यात आल्याची उदाहरणं समोर आली होती. उमदेवारांनी परीक्षा आणि भरती प्रक्रियेदरम्यान गैरप्रकारांपासून दूर राहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
इतर बातम्या:
Omicron : भारतातील ओमिक्रॉनची रुग्णसंख्या 415 वर, महराष्ट्रात सर्वाधिक रुग्णांची नोंद
शंभर दीडशे नाही, पावणे दोनशे कोटी सापडले, नोटा मोजायलाही 13 मशिन्स, कानपूरच्या रेडमध्ये नवं ‘शिखर’!
Pune SRPF Police caught two candidates for malpractice during physical test of Police constable recruitment