Pune News : पार्सलमध्ये ड्रग्सच्या नावावर कशी केले जातेय फसवणूक, सायबर ठगांकडून कसा सुरु आहे प्रकार

Cyber crime in Pune : पुणे शहरात फसवणुकीचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका विद्यार्थीनी आणि तिच्या आईची सुमारे ५३ लाखांत फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Pune News : पार्सलमध्ये ड्रग्सच्या नावावर कशी केले जातेय फसवणूक, सायबर ठगांकडून कसा सुरु आहे प्रकार
Follow us
| Updated on: Aug 10, 2023 | 3:03 PM

पुणे | 10 ऑगस्ट 2023 : पुणे शहरात गुन्हेगारी वाढत असताना सायबर फसवणुकीचे अनेक प्रकार उघड होत आहेत. विविध माध्यमातून लोकांना जाळ्यात ओढत त्यांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. कधी बँकेचे खाते रिकामे केले जाते? कधी सोशल मीडियाच्या खात्याचा वापर केला जातो, आता फसवणुकीचा नवा प्रकार समोर आला आहे. पार्सलमध्ये ड्रग्स असल्याचे सांगत पुणे शहरात अनेकांची फसवणूक केली गेली. 53 लाखांची फसवणूक एका विद्यार्थीनीची आणि तिच्या आईची केली गेली आहे.

काय आहे प्रकार

पुणे शहरात राहणारी एक विद्यार्थी आणि तिच्या आईची फसवणूक झाली आहे. सायबर ठगांनी त्यांना आपण कुरियर कर्मचारी असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीस अधिकारी असल्याचा दावा केला. त्यामाध्यमातून ५३ लाखांची फसवणूक केली आहे. आतापर्यंत दोन कोटींमध्ये अशी फसवणूक केली गेली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भामट्यांनी काय केले

ठगांनी विद्यार्थीनीला फोन करुन सांगितले की, तुमचे तैवानमधून पार्सल आले आहे. झांग लिन नावाच्या व्यक्तीने हे पार्सल पाठवले आहेत. परंतु त्यामध्ये ड्रग्स आणि सहा पासपोर्ट आहेत. यासंदर्भात कायदेशीर कारवाई केली जाईल. हे प्रकरण एंटी नायकोटिक्स सेलकडे जाईल. मग पोलीस नायकोटिक्स सेलकडून तुम्हाला खूप प्रश्न विचारले जातील. तुम्ही अडचणीत याल. त्यामुळे एंटी नारकोटिक्स सेल ऑफ मुंबईच्या कार्यालयात संपर्क करा.

हे सुद्धा वाचा

विद्यार्थीनी घाबरली अन्…

कारवाई होण्याच्या भीतीने विद्यार्थीनी घाबरली. काही तासांत त्यांनी ३४ आर्थिक व्यवहार केले. यामाध्यमातून ५३.६५ लाखांची फसवणूक त्यांची झाली. वेगवेगळ्या बँकेच्या खात्यात है पैसे ट्रन्सफर केले गेले. त्या विद्यार्थीनी अन् तिच्या आईला समजले की आपली फसवणूक होत आहे, त्यानंतर त्यांनी पैसे ट्रॅन्सफर करणे थांबवले. तसेच पोलीस ठाण्यात त्यांनी धाव घेतली.

पोलिसांनी केला तपास सुरु

पोलिसांनी सांगितले की, पार्सलमध्ये ड्रग्स असल्याचे कारण सांगत आतापर्यंत सायबर ठगांनी अनेक जणांची फसवणूक झाली आहे. फसवणुकीची ही आकडेवारी सुमारे दोन कोटी रुपये आहे. पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.