स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पीडितेचा वैद्यकीय अधिकारी अन् पोलिसांवर गंभीर आरोप, ‘इच्छा नसताना…’
Pune Swargate Rape Case: आम्ही तीन वकिलांची नावे सुचवू. त्यातून एक वकील तुम्ही निवडा. मी पोलिसांना असीम सरोदे यांची नेमणूक करावी, असे सांगितले. परंतु पोलिसांनी उशीर झाल्याचे कारण दिले. असीम सरोदे सर्व दृष्टीने नियुक्ती होण्यासाठी पात्र आहे.

Pune Swargate Rape Case: पुणे येथील स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पीडित युवतीने पोलिसांवर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यासंदर्भातील पत्र तिने राज्याच्या विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिवांना लिहिले आहे. या पत्रात पोलिसांकडून आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळणारी वागणूक तिने लिहिली आहे. आपण मागणी केलेल्या वकिलांची नेमणूक न करता दुसराच वकील आपणास देण्यात आल्याचे तिने पत्रात म्हटले आहे. या प्रकरणात असीम सरोदे यांची वकील म्हणून नेमणूक करण्याची मागणी तिने केली आहे.
पीडितीने दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, अनेक पुरुष पोलीस अधिकाऱ्यांना मला माझ्यावर कसा अत्याचार करण्यात आला ते सांगावे लागत होते. त्या ठिकाणी महिला पोलीस अधिकारी हवे होते. तसेच पुरुष वैद्यकीय अधिकारी माझी इच्छा नसताना माझी समंती घेऊन वैद्यकीय चाचणी करत होते. त्याचवेळी माझ्या चारित्र्यावर चिखलफेक करणारे वक्तव्य आरोपींचे प्रतिनिधी करत होते. काही राजकीय मंडळीही माझी बदनामी करणारे वक्तव्य करत होते.
मनोधैर्य योजनेतून मदतीची मागणी
जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांनी मला मदतीसंदर्भात काहीच निर्णय घेतला नाही. मनोधैर्य योजनेतून मला आर्थिक मदत मिळावी आणि माझ्या निवडीचा वकील मला मिळावा, अशी मागणी पीडितेने पत्रात केली आहे. तिने पत्रात म्हटले आहे की, आरोपी दत्ता गाडे याने माझ्यावर दोन वेळा बलात्कार केला. त्यानंतर तिसऱ्यांदा अनैसर्गिकपणे बलात्काराचा प्रयत्न केला. पूर्ण ताकदीने मी विरोध केला त्यानंतर दत्ता गाडे पळून गेला. माझ्यावर जो प्रसंग आला तो कोणावर येऊ नये म्हणून मी लढा देत आहे.




असीम सरोदेच का?
पोलिसांनी मला सांगितले होते की, आम्ही तीन वकिलांची नावे सुचवू. त्यातून एक वकील तुम्ही निवडा. मी पोलिसांना असीम सरोदे यांची नेमणूक करावी, असे सांगितले. परंतु पोलिसांनी उशीर झाल्याचे कारण दिले. असीम सरोदे सर्व दृष्टीने नियुक्ती होण्यासाठी पात्र आहे. माझा त्यांच्यावर विश्वास आहे. त्यांच्याशी मोकळपणे संवाद साधणे मला शक्य आहे, अशी मागणी पत्रातून पीडितेने केली आहे.