पुणे शहरात अटक केलेल्या दहशतवाद्यांची योजना उघड, एटीएसच्या तपासात महत्वाची माहिती

Pune Crime News : पुणे शहरात अटक केलेल्या दहशतवाद्यांची योजना उघड झाली आहे. एटीएसने त्यांच्या कटाचा भांडाफोड न्यायालयात केला आहे. त्या आरोपींनी बॉम्ब बनवण्याची शिबीरसुद्धा घेतल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे शहरात अटक केलेल्या दहशतवाद्यांची योजना उघड, एटीएसच्या तपासात महत्वाची माहिती
pune terrorist
Follow us
| Updated on: Aug 06, 2023 | 8:49 AM

योगेश बोरसे, पुणे | 6 ऑगस्ट 2023 : पुणे शहरात दोन दशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. एका मोटारसायकल चोरीच्या प्रकरणात सापडलेले हे दोघे एनआयएच्या यादीत मोस्ट वॉटेंड असणारे दहशतवादी निघाले होते. इम्रान खान आणि मोहम्मद युनूस साकी अशी त्यांची नावे आहेत. १८ जुलै रोजी त्यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना मदत करणारे अब्दुल कादीर दस्तगीर पठाण आणि सिमाब नसरुद्दीन काझी यांनाही अटक केली. कारागृहात असलेला झुल्फीकार अली बडोदावाला असे पाच जणांच्या या साखळीचा मोठा भांडाफोड झाला आहे. एटीएसने त्यांचा कट न्यायालयात उघड केला आहे.

आरोपींकडून गाडी जप्त

पुण्यात दोघे दहशतवादी वापरत असलेली गाडी एटीएसने जप्त केली आहे. पुणे आणि इतर ठिकाणी रेकी करण्यासाठी त्यांनी ही दुचाकी वापरली होती. तसेच त्यांच्याकडे असलेली एक चार चाकी देखील सापडली. या गाडीत २ पिस्तुल आणि ५ जिवंत काडतुसे मिळाली आहे. घरी कोणाला पिस्तुल अन् काडतुसे सापडू नये म्हणून त्यांनी ती गाडीत लपवून ठेवली होती.

बडोदावालाने घेतले बॉम्ब बनवण्याचे शिबीर

पाचही दहशतवादी एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांनी जगभरातील दशतवादी कृत्यांचा अभ्यास केला होता. हे सर्व जण एकमेकांच्या संपर्कात होते. इसिसशी संबंधित असलेला झुल्फीकार अली बडोदावाला याने दोन दशतवाद्यांमार्फत इतर साथीदारांसाठी बॉम्ब बनवण्याचे शिबीर घेतल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यासाठी त्यांनी निर्बंध असलेली रसायने आणि स्फोटके खरेदी केली होती.

हे सुद्धा वाचा

पुणे शहरात बंदोबस्त

पुणे शहरात दहशतवादी सापडले होते. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शह पुणे दौऱ्यावर एका कार्यक्रमसाठी आले आहे. यामुळे पुणे पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. अमित शहा ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत त्या हॉटेल परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. डॉग स्कॉड पथक, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक हॉटेल परिसरात दाखल झाले आहे. डॉग स्कॉड पथकाने केली हॉटेलची तपासणी केली आहे.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.