Pune Crime : दहीहंडीमध्ये नाचताना तरुणावर वार करत हवेत गोळबार! वडगाव धायरीत खळबळ, सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा

Pune Firing at Dahi Handi : शुभम जयराजय मोरे हा महादेव नगर, वडगाव धायरी इथं राहायला आहे. तो दहीहंडीत गाण्यांच्या तालावर नाचत होता. यावेळी शुभमवर टोळक्याने वार केला, त्याला मारहाण केली आणि हवेत गोळीबारही करण्यात आला. या घटनेत शुभम मोरे हा तरुण जखमी झाला होता.

Pune Crime : दहीहंडीमध्ये नाचताना तरुणावर वार करत हवेत गोळबार! वडगाव धायरीत खळबळ, सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 7:22 AM

पुणे : दहीहंडेमध्ये नातच असताना एका तरुणावर गोळीबार करण्यात आला. ही घटना वडगाव धायरी (Pune Crime News) इथं घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. दहीहंडीत (Pune Dahi handi) गाण्यांच्या तालावर नाचत असताना पूर्वीच्या भांडणाच्या राहातून टोळण्यात एका तरुणावर वार करत हवेत गोळीबार (Firing in Wadgaon Dhayari) केला होता. यामुळे एकच गोंधळ उडाला होता. शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. वेताळ मित्र मंडळाकडून दहीहंडी साजरी केली जात होती. त्यावेळी हा प्रकार घडल्यानंतर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचं काम सुरु होतं. सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत असून गोळीबार करणाऱ्या तरुणाची ओळखही पटली आहे. तसंच या घटनेत एक तरुण जखमी झाला होता.

आधी मारहाण आणि मग गोळीबार

शुभम जयराजय मोरे हा महादेव नगर, वडगाव धायरी इथं राहायला आहे. तो दहीहंडीत गाण्यांच्या तालावर नाचत होता. यावेळी शुभमवर टोळक्याने वार केला, त्याला मारहाण केली आणि हवेत गोळीबारही करण्यात आला. या घटनेत शुभम मोरे हा तरुण जखमी झाला होता. हवेत गोळीबाराचा आवाज झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणाची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी लगेचच गंभीर दखल घेत पुढील तपास सुरु केला. प्राथमिक तपासात ओंकार लोहकरे या तरुणाने हवेत गोळीबार केला असल्याची माहिती समोर आली आहे.

हे सुद्धा वाचा

सिंहगड रोड पोलिसांकडून अधिक तपास

शुभम मोरे हा त्याच्या मित्रांसोबत दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेल्या ठिकाणी गाण्यांवर नाचत होता. वडगावमधील महादेव नगर येथील वेताळ मित्र मंडळाकडून शुक्रवारी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी शुभम मोरे या तरुणाला आधी मारहाण करण्यात आली. त्यानंतर संशयित आरोपी ओंकार लोहकरे यांने आपल्याकडे असलेली पिस्तुल काढली आणि हवेत गोळीबार केला. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते. सध्या पोलिसांकडून या प्रकरणी संशयित आरोपींची कसून चौकशी केली जाते आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.