pune accident: पोर्शे अपघातानंतरही पुण्यात रॅश ड्रायव्हिंगचे सत्र सुरुच, दोन महाविद्यालयीन युवकांना उडवले
pune accident: अपघातानंतर लोकांनी ही माहिती तातडीने पोलिसांना दिली. घटनास्थळी विमानगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोहचले. त्यांनी जखमींना त्वरीत रुग्णालयात पाठवले. परंतु तिघांपैकी एकाचा घटनास्थळावर मृत्यू झाला होतो.
पुणे शहरातील पोर्श अपघाताचे वादळ अजूनही शमले नाही. बड्या बापाच्या अल्पवयीन मुलाने केलेल्या या अपघातात सर्वच सरकारी यंत्रणा मॅनेज करण्याचा प्रयत्न झाला. परंतु सामाजिक संघटना, माध्यमे आणि राजकीय पक्षांनी हा विषय लावून धरल्यामुळे या प्रकरणात नऊ जणांना अटक झाली आहे. त्या प्रकरणानंतर पुन्हा दोन महाविद्यालयीन विद्यार्थी अपघाताचे बळी पडले आहे. एक जण गंभीर जखमी झाला आहे. वाघोली येथे शिक्षण घेणाऱ्या लातूरमधील दोन महाविद्यालयीन युवकांचा मृत्यू झाला आहे. या तरुणांची दुचाकी जकात नाका सिग्नलवर थांबलेले असताना भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांना उडवले. त्यातील एका तरुणाचे नाव आदिल शेख आहे. इतर दोघांनी नावे अजून समजले नाही.
थांबलेल्या दुचाकीला धडक
वाघोलीतून पुण्याच्या दिशेने मालवाहतूक करणारा ट्रक (MH 12 VF 6441) येत होता. त्यावेळी जकात नाका चौकातील सिग्नलवर एका दुचाकीवर तिघे जण थांबले होते. भरधाव वेगाने असणाऱ्या ट्रकने मागून दोघांना धडक दिली. त्या जोरदार धडकेमुळे तिघे जण फरफटत गेले. त्यातील दोघांचा मृत्यू आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी रात्री 10.30 वाजता हा अपघता घडला. महाविद्यालयीन युवक हे मूळचे लातूरचे आहेत. ते वाघोली येथील महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. या प्रकरणी ट्रक चालक श्यामबाबू रामफळ गौतम याला अटक करण्यात आली आहे.
दोघांचा मृत्यू, तिसऱ्याची प्रकृती गंभीर
अपघातानंतर लोकांनी ही माहिती तातडीने पोलिसांना दिली. घटनास्थळी विमानगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोहचले. त्यांनी जखमींना त्वरीत रुग्णालयात पाठवले. परंतु तिघांपैकी एकाचा घटनास्थळावर मृत्यू झाला होतो. दुसरा जखमी झालेल्या युवकाचा रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी मृत्यू झाला. तिसऱ्या युवकावर उपचार सुरु आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे.
ट्रकचालकाला 300 मीटरवर रोखले
अपघातासंदर्भात माहिती देताना विमाननगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद खोबरे यांनी सांगितले की, अपघात झाल्यानंतरही ट्रक थांबला नव्हता. परंतु पोलीस आणि लोकांनी अपघातस्थळाच्या 300 मीटर अंतरावर त्याला थांबवले. ट्रक चालक श्यामबाबू रामफळ गौतम याच्यावर भादंवि कलम 304 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात 19 मे रोजी दोन अभियंत्याना पोर्श गाडीने उडवले होते. त्यानंतर पुन्हा रॅश ड्रायव्हिंगचा हा दुसरा प्रकार आहे.