अमेरिकेत नोकरीसाठी गेला…तीन दिवसांपूर्वी जहाजावरुन बेपत्ता… कंपनीवर पालकांचा आरोप

विल्हेल्मसेन शिप मॅनेजमेंट या कंपनीची 1861 मध्ये नॉर्वेमध्ये स्थापन झाली आहे. कंपनी जहाजांना क्रू आणि तांत्रिक व्यवस्थापन पुरवते. कंपनीचे जवळपास 60 देशांमध्ये हजारो कर्मचारी आहेत. त्यामुळे प्रणव कराड या कंपनीत रुजू होण्यासाठी गेला होता.

अमेरिकेत नोकरीसाठी गेला...तीन दिवसांपूर्वी जहाजावरुन बेपत्ता... कंपनीवर पालकांचा आरोप
pranav karad
Follow us
| Updated on: Apr 07, 2024 | 12:57 PM

पुणे शहरातील युवकाची अमेरिकेत मोठ्या जहाज कंपनीवर निवड झाली होती. अमेरिकेत जहाजावर डेस्क कॅडेट म्हणून तो रुजूही झाला होता. परंतु अमेरिकेतून तो ५ एप्रिलपासून बेपत्ता झाला आहे. कंपनीने तुमचा मुलगा बेपत्ता झाला असून त्याचा शोध घेतला जात असल्याचे कळवले होते. त्यानंतर मात्र काहीच माहिती कंपनीकडून दिली जात नसल्याने मुलाचे पालक धास्तावले आहेत. त्यांनी पुणे येथील वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. प्रणव गोपाळ कराड असे बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव आहे.

पोलिसांकडे तक्रार

प्रणव कराड याच्या वडिलांनी वारजे पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, प्रणव हा पुण्यातील एमआयटीमध्ये शिक्षण घेत होता. त्याची निवड विल्हेल्मसेन शिप मॅनेजमेंट या अमेरिकेतील कंपनीत झाली होती. तो अमेरिकेत ज्वाईन होण्यासाठी गेला होता. जहाजावर डेस्क कॅडेट म्हणून तो काम करु लागला. परंतु ५ एप्रिल रोजी कंपनीकडून तो हरवल्याचा फोन आला. त्यानंतर या संदर्भात ६ एप्रिल रोजी मेल आला. परंतु त्यानंतर कंपनीकडून काहीच माहिती दिली जात नाही.

विल्हेल्मसेन शिप मॅनेजमेंट कंपनीकडून प्रणव याच्या सहकारी आणि मित्रांचे मोबाईल क्रमांक देण्यास नकार दिला आहे, असा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात परराष्ट्र मंत्रालय, जहाजबांधनी मंत्रालयाशी संपर्क करुन मुलाचा शोध घ्यावा, अशी मागणी गोपाळ कराड यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

कंपनीचे 60 देशांमध्ये कर्मचारी

विल्हेल्मसेन शिप मॅनेजमेंट या कंपनीची 1861 मध्ये नॉर्वेमध्ये स्थापन झाली आहे. कंपनी जहाजांना क्रू आणि तांत्रिक व्यवस्थापन पुरवते. कंपनीचे जवळपास 60 देशांमध्ये हजारो कर्मचारी आहेत. त्यामुळे प्रणव कराड या कंपनीत रुजू होण्यासाठी गेला होता. तो बेपत्ता झाल्याचा मेल कंपनीकडून कुणाल यांनी ६ एप्रिल रोजी केला. परंतु त्यानंतर काहीच माहिती दिली जात नसल्यामुळे प्रणव यांचे कुटुंबीय हादरले आहे. मुलाच्या शोध घेण्यासाठी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.