Pune Crime: खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्सच्या दुकानात घुसायचे, अंगठ्या चोरुन पसार व्हायचे; मैत्रिणींना गिफ्ट देण्यासाठी तरुणांचा फंडा

दोघेही तरुण पुण्यातील नामांकित महाविद्यालयात वैद्यकीय शाखेत शिक्षण घेत आहेत. त्यातील एक जण बीएएमएस तर दुसरा बीएससी नर्सिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे. हडपसर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल आहे.

Pune Crime: खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्सच्या दुकानात घुसायचे, अंगठ्या चोरुन पसार व्हायचे; मैत्रिणींना गिफ्ट देण्यासाठी तरुणांचा फंडा
भोजपुरी नायकाकडून पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 6:58 PM

पुणे : मैत्रिणीला गिफ्ट देण्यासाठी आणि व्यसनासाठी सराफा दुकानात चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अनिकेत हनुमंत रोकडे (23) आणि वैभव संजय जगताप (22) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सोने विकत घेण्याच्या बहाण्याने हे चोरटे पुण्यातील नामांकित सराफा दुकानात घुसायचे आणि दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना हडपसर पोलिसांनी अटक केली.

दोघेही तरुण वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी

दोघेही तरुण पुण्यातील नामांकित महाविद्यालयात वैद्यकीय शाखेत शिक्षण घेत आहेत. त्यातील एक जण बीएएमएस तर दुसरा बीएससी नर्सिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे. हडपसर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल आहे.

खरेदीच्या बहाण्याने दुकानात घुसायचे आणि चोरी करुन पळायचे

अनिकेत रोकडे आणि वैभव जगताप हे 8 डिसेंबर रोजी हडपसर येथील रांका ज्वेलर्समध्ये सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी गेले होते. यावेळी दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने या दोघांनी दुकानातील सोन्याच्या अंगठ्या चोरल्या आणि निघून गेले. अंगठ्या चोरीला गेल्याचे दुकान मालकाच्या लक्षात येताच त्याने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला असता कोथरुडमध्ये एका ज्वेसर्समध्ये दोन तरुणांनी अशाच प्रकारे चोरी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी दोन्ही दुकानातील सीसीटीव्ही तपासले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन्ही दुकानातील चोरी याच तरुणांनी केल्याचे उघड झाले. त्यानुसार सीसीटीव्हीच्या आधारे हडपसर पोलिसांनी आरोपी तरुणांना अटक केली आहे.

अटक केल्यानंतर आरोपींची चौकशी केली मैत्रिणींना गिफ्ट देण्यासाठी आणि स्वतःची व्यसन करण्यासाठी आपण चोरी केल्याची त्यांनी पोलिसांसमोर कबुल केले. या दोघांकडून चार सोन्याच्या अंगठ्या पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. या अंगठ्यांची किंमत सुमारे अडीच लाख रुपये आहे. (Robbery at a jeweler’s shop in Pune under the pretext of shopping)

इतर बातम्या

Pune crime |पिकअप गाडीचा दरवाजा उचकटून लांबवले अडीच लाख ; अज्ञातावर गुन्हा दाखल

Video | Shocking | Tragedy | गळफास घेण्याची एक्टिंग करताना स्टूलवरुन पडला आणि…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.