VIDEO : पुण्यात भर दिवसा महाराष्ट्र बँकेवर दरोडा, बंदुकीचा धाक दाखवत कोट्यवधींचं सोनं लुटलं, लाखोंची रोकड लंपास
पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना प्रचंड वाढताना दिसत आहेत. विशेष म्हणजे गुन्हेगारांना पोलिसांची अजिबात भीती राहिलेली नाही. हे वारंवार विविध घटनांमधून समोर येतंय. आतादेखील अशीच घटना समोर आली आहे.
शिरुर (पुणे) : पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना प्रचंड वाढताना दिसत आहेत. विशेष म्हणजे गुन्हेगारांना पोलिसांची अजिबात भीती राहिलेली नाही. हे वारंवार विविध घटनांमधून समोर येतंय. आतादेखील अशीच घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात भर दिवसा चक्क महाराष्ट्र बँकेवर दरोडा पडला आहे. दरोडेखोरांनी बंदूकीचा धाक दाखवत बँकेतील लाखो रुपयांची रोख रक्कम आणि कोट्यवधींचे सोने लंपास केले आहे. संबंधित घटना उघड झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत अचूकपणे कैद झाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
संबंधित घटना ही शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे घडली आहे. पिंपरखेड येथे भर दिवसा दुपारी दीड वाजेच्या सुमारास महाराष्ट्र बँकेत दरोडा पडला. दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत बँकेतील 31 लाख रुपये रोकड तसेच 2 कोटी रुपयांचे सोने पळवून नेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संबंधित प्रकार हा बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेले जवळपास पाच आरोपी हे बँकेत शिरले. ते चारचाकी वाहनातून आले होते. त्यांनी तोंड बांधलं होतं. ते बँकेत शिरले तेव्हा त्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत सर्व कॅश पिशवित भरुन द्यायला सांगितली. तसेच त्यांनी बँकेच्या लॉकरमधील सर्व सोनं पिशवीत भरुन चारचाकी गाडीतून पळवून नेलं.
पोलिसांकडून तपास सुरु
दरोड्याच्या घटनेनंतर तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस वेळेचा विलंब न करता तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बँकेतील सर्व परिस्थितीची पाहणी करत पंचनामा केला. यावेळी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली. यावेळी सीसीटीव्हीत सर्व प्रकार कैद झाल्याचं उघडकीस आलं आहे. पण चोरांनी तोंड बांधलं होतं. तसेच त्यांनी हातात ग्लोव्ज घातलेले नाही. याशिवाय संबंधित परिसर हा ग्रामीण भाग. त्यामुळे पोलिसांपुढे चोरांचा शोध घेण्यासाठी अनेक आव्हानं आहेत. पोलीस उपलब्ध पुराव्यांच्या आधारावर चोरांना कसं बेड्या ठोकते ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
VIDEO : पुण्यात भर दिवसा महाराष्ट्र बँकेवर दरोडा, बंदुकीचा धाक दाखवत कोट्यवधींचं सोनं लुटलं, लाखोंची रोकड लंपास#MaharashtraBank #Pune #Crime #Robbery pic.twitter.com/q5oWBeSKas
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2021
घटनेचे आखणी काही व्हिडीओ बघा :
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2021
विवारमध्ये आयसीआयसीआय बँकेवर दरोडा
दरम्यान, काही महिन्यांआधी विरारमध्ये आयसीआयसीआय बँकेवर दरोडा पडल्याची घटना समोर आली होती. आयसीआयसीआय बॅंकेच्या विरार पूर्वे शाखेत असिस्टंट मॅनेजर योगिता चौधरी-वर्तक आणि श्रद्धा देवरुखकर या दोघी उशीरा सायंकाळपर्यंत बॅंकेतच काम करत होत्या. बॅंकेचा माजी मॅनेजर अनिल दुबे याने ओळखीचा फायदा उचलत बॅंकेच्या आत प्रवेश केला. त्यानंतर त्याने चाकूने योगिताच्या गळ्यावर-चेहऱ्यावर वार केले.
घटनेचं गांभीर्य ओळखून श्रद्धा हिने बॅंकेची इमरजन्सी अलार्म बेल वाजवली. त्यामुळे बाहेरचे नागरीक सतर्क झाले. मात्र तोपर्यंत आरोपी अनिल दुबे याने श्रद्धावरही अनेक वार केले. त्यात ती देखील गंभीर जखमी झाली. जखमी अवस्थेत श्रद्धाने प्रतिकार केला. पण आरोपीसमोर तिची ताकद कमी पडल्याने त्याने बॅंकेतील 1 कोटी 38 लाखांचं सोनं आणि रोख रक्कम बॅगेत भरली. त्यानंतर तो बँकेबाहेर पडून फरार होण्यात यशस्वी झाला होता.
हेही वाचा :
6 कांदा व्यापाऱ्यांवर 13 ठिकाणी आयकरचे छापे; पिंपळगाव बसवंत येथील कारवाईने खळबळ
तोंडोळी दरोड्यानं औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचे धाबे दणाणले, वाचा वर्षात किती चोऱ्या, किती घरफोड्या?