सुरक्षा भिंतीवरुन दरोडेखोर आले, तब्बल 25 लाखांचा मुद्देमाल लुटला, 9 आरोपींना बेड्या

जिल्ह्यातील चाकण औद्योगिक परिसरातील व्ही टेक इंडस्ट्रीज इंडिया या कंपनीवर दरोडा टाकण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेत कंपनीच्या सुरक्षा भिंतीवरून 7 पुरुष व 2 महिला दरोडेखोरांनी आतामध्ये प्रवेश करत तब्बल 25 लाखांचा मुद्देमाल लुटला.

सुरक्षा भिंतीवरुन दरोडेखोर आले, तब्बल 25 लाखांचा मुद्देमाल लुटला, 9 आरोपींना बेड्या
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Jun 28, 2021 | 11:28 PM

पुणे : जिल्ह्यातील चाकण औद्योगिक परिसरातील व्ही टेक इंडस्ट्रीज इंडिया या कंपनीवर दरोडा टाकण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेत कंपनीच्या सुरक्षा भिंतीवरून 7 पुरुष व 2 महिला दरोडेखोरांनी आतामध्ये प्रवेश करत तब्बल 25 लाखांचा मुद्देमाल लुटला. यामध्ये दरोडेखोरांनी कंपनीच्या सुरक्षा रक्षलाही मारले आहे. या प्रकरणी सध्या दोन महिला आणि सहा जणांना अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार आहेत. (robbery has taken place in Pune Chakan industrial area total nine accused arrested)

सात पुरुष आणि दोन महिला अवैध मार्गाने आत घुसले

मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक परिसरात एक व्ही टेक इंडिस्ट्रीज इंडिया ही कंपनी आहे. या कपंनीमध्ये स्पेअर पार्टचे उत्पादन होते. मात्र, यावेळी कंपनीत एकूण सात पुरुष आणि दोन महिला अवैध मार्गाने घुसले. त्यांनी कंपनीच्या आतमध्ये प्रवेश करत आधी सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. तसेच त्याच्या डोळ्यात मिर्चीची पूडही टाकली.

दरोड्यामध्ये 25 लाखांचा मुद्देमाल पळवला

त्यानंतर या दरोडेखोरांनी तांबे, पितळ या धातूचे टर्मिनल, लग्ज, वायरिंग हर्णेस असे स्पेअर पार्ट्स पळवले. तसेच सुरक्षा रक्षकांचे एकूण तीन मोबाईल फोन चोरी केले. या दरोड्यामध्ये त्यांनी एकूण 25 लाख 87 हजार 247 रुपये किंमतीचा मुद्देमाल लुटून नेला.

पोलिसांकडून 33  लाखांचा मुद्देमाल जप्त

दरम्यान दरोडा टाकणाऱ्या टोळीला म्हाळुंगे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आपल्या कारवाईमध्ये दोन महिला आणि सहा तरुणांना अटक केली आहे. ह्या दरोडेखोरांनी तांबे, पितळ या धातूचे एकूण 25,87,247 लाख किमतीचे स्पेअर पार्ट दरोडा टाकून लुटले. ह्या प्रकरणी चाकण म्हाळुंगे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच या आरोपींकडून पोलिसांनी तब्बल 33 लाख 34 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अद्याप दोन आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

इतर बातम्या :

ईडीला सर्व पुरावे मिळाले, अनिल देशमुखांना अटक होईल : अ‍ॅड. जयश्री पाटील

Ambil Odha : बिल्डरवर कारवाई करा, अन्यथा पोलीस आयुक्तांविरोधात मानवी हक्क आयोगाकडे जाणार, प्रकाश आंबेडकरांचा इशारा

अरुंद आणि कच्चा रस्ता बनला धोकादायक, डंपरची दोन चाकं चक्क हवेत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

(robbery has taken place in Pune Chakan industrial area total nine accused arrested)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.