Shrikant Deshmukh : आमचं लग्न झालंय, श्रीकांत देशमुखची हनी ट्रॅपची केस खोटी, देशमुखांपासून जीवाला धोका; पीडितेचा आरोप

श्रीकांत देशमुख यांनी आपल्यासोबत पुण्यातील डेक्कन भागातील एका हॉटेलमधे, मुंबईतील खेतवाडी भागातील एका हॉटेलमधे, सोलापूरमधील शासकीय विश्रामगृहात आणि सांगलीतील खासदार संजय पाटील यांच्या हॉटेलमधे वेळोवेळी शरीर संबंध ठेवल्याचे पिडीत महिलेने तक्रारीत म्हटलंय.

Shrikant Deshmukh : आमचं लग्न झालंय, श्रीकांत देशमुखची हनी ट्रॅपची केस खोटी, देशमुखांपासून जीवाला धोका; पीडितेचा आरोप
श्रीकांत देशमुखImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 18, 2022 | 8:29 PM

पुणे : सोलापूर भाजपचे बडतर्फ जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख (Shrikant Deshmukh) यांच्याविरुद्ध पिडीत महिलेने तक्रार दिल्यानंतर पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात लैंगिक शोषण आणि फसवणुकी (Fraud)चा गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल झाल्यानंतर पीडित महिलेने आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी महिलेने श्रीकांत देशमुख यांच्यावर अनेक आरोप (Allegation) केले आहेत. श्रीकांत देशमुख या माणसाने मला फसवलं असून त्याच्यापासून माझ्या जीविताला धोका आहे. आमचे लग्न झालेलं असतानाही त्याने हे नातं नाकारून उलट माझ्यावरच हनी ट्रँपची खोटी केस दाखल केली आहे, अशा आरोप महिलेने केला आहे.

श्रीकांत देशमुखला शिक्षा ही झालीच पाहिजे

माढ्याचे खासदार रणजीत निंबाळकर हे चिञा वाघ यांच्याशी माझी भेट घडवून हे प्रकरण मिटवण्याच्या प्रयत्नात होते. पण मी ती ऑफर नाकारली. मला भाजपकडून न्याय हवाय, मला देवेंद्र फडणवीस यांनाही भेटून माझी व्यथा मांडायची आहे. श्रीकांत देशमुखला शिक्षा ही झालीच पाहिजे. म्हणूनच मी आज डेक्कन पोलीस ठाण्यात रितसर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. माझा व्हायरल झालेला व्हिडिओ कोणी व्हायरल केला हे मला माहिती नाही, असे पीडिता म्हणाली.

श्रीकांत देशमुखने लग्नाचे आश्वासन देऊन फसवले

श्रीकांत देशमुख यांनी आपल्यासोबत पुण्यातील डेक्कन भागातील एका हॉटेलमधे, मुंबईतील खेतवाडी भागातील एका हॉटेलमधे, सोलापूरमधील शासकीय विश्रामगृहात आणि सांगलीतील खासदार संजय पाटील यांच्या हॉटेलमधे वेळोवेळी शरीर संबंध ठेवल्याचे पिडीत महिलेने तक्रारीत म्हटलंय. श्रीकांत देशमुख सोबत आपली आधीपासून ओळख होती. आपण मुंबई भाजप शहर युवा मोर्चा जनरल सेक्रेटरी युवती सेल पदावर काम करत असताना श्रीकांत देशमुख यांच्यासोबत आपली ओळख वाढत गेली. श्रीकांत देशमुख यांनी आपल्याला तुळजापुरच्या मंदिरात लग्नाचे आश्वासन दिले होते. पण नंतर आपल्याला फसवल्याचं पिडीत महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय. (Sacked District President of Solapur BJP Shrikant Deshmukh allegation of victim woman)

हे सुद्धा वाचा

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.