Pune Crime : सिद्धू मुसावाला हत्या प्रकरणातील आरोपीला अटक, मोक्का प्रकरणी पुणे पोलिसांची कारवाई

सौरभ महाकाळ आणि संतोष जाधव यांचा या हत्या प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलीस या दोघांचा शोध घेत होते. यापैकी सौरभ महाकाळला पोलिसांनी अटक केली आहे.

Pune Crime : सिद्धू मुसावाला हत्या प्रकरणातील आरोपीला अटक, मोक्का प्रकरणी पुणे पोलिसांची कारवाई
सिद्धू मुसावाला हत्या प्रकरणातील आरोपीला अटकImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 5:59 PM

पुणे : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणातील आरोपीला पुणे पोलिसांनी मोक्का (Mocca) प्रकरणी अटक केली आहे. सौरभ उर्फ सिद्धेश उर्फ महाकाल हिरामण कांबळे असे या अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मुसेवाला हत्या प्रकरणात एकूण आठ आरोपींची नावे समोर आली होती. यापैकी दोन पुण्यातील आहेत. सौरभ महाकाळ आणि संतोष जाधव यांचा या हत्या प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलीस या दोघांचा शोध घेत होते. यापैकी सौरभ महाकाळला आज पुणे ग्रामीण पोलिसां (Pune Rural Police)नी मोक्का अंतर्गत अटक केली आहे. सौरभच्या अटकेबाबत पुणे पोलिसांकडून पंजाब पोलिसांना माहिती कळवण्यात आली आहे.

आरोपीला 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी

सौरभला पुणे मोक्का न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मूसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी संतोष जाधव हा फरार असून त्याच्याविरोधात अटक वॉरंट आहे. संतोष जाधव फरार असताना सौरभ उर्फ सिद्धेश उर्फ महाकाल हिरामण कांबळे याने त्यास आसरा दिल्याची गोपनीय माहिती पुणे पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार पोलिसांनी पुणे-अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरुन पोलिसांनी काल ताब्यात घेतले. त्यानंतर आज त्याला मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्यासह पोलीस निरीक्षक सतीश होडगर, सहायक पोलीस निरीक्षक कांबळे, सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सहायक फौजदार मोहिते, पोलीस नामदार वाफगावकर करीत आहेत. (Saurabh Mahakal arrested by Pune police in Sidhu Musewala murder case)

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.