पुण्यात शिक्षिकेकडून विद्यार्थ्यास लाथा बुक्यांनी बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

पुण्यातील एका नामवंत शाळेत ही घटना घडली आहे. या संदर्भात मुलाच्या पालकाने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझा मुलगा शिकत असलेल्या शाळेतील एक शिक्षक रजेवर होते. त्या शिक्षकांच्या जागी पूजा केदारी यांनी विद्यार्थ्यास मारहाण केली.

पुण्यात शिक्षिकेकडून विद्यार्थ्यास लाथा बुक्यांनी बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल
school (file photo)
Follow us
| Updated on: Apr 12, 2024 | 2:43 PM

‘छडी लागे छम छम विद्या येई घम घम’ हे दिवस जाऊन आता शाळेत हसत-खेळत शिक्षण प्रणाली आहे. परंतु त्यानंतर काही शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मारहाण केली जाते. आता शिक्षणाचे केंद्र असलेल्या पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना महिन्यापूर्वी घडली आहे. परंतु त्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. एका शिक्षिकेने विद्यार्थ्याला जबरदस्त मारहाण केली आहे. लाथाबुक्यांनी ही मारहाण केली आहे. वर्गात दंगा करत असल्याचे पाहून ही मारहाण झाली आहे. दरम्यान या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.

काय झाला प्रकार

पुण्यातील एका नामवंत शाळेत ही घटना घडली आहे. या संदर्भात मुलाच्या पालकाने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझा मुलगा शिकत असलेल्या शाळेतील एक शिक्षक रजेवर होते. त्या शिक्षकांच्या जागी पूजा केदारी या शिक्षिका वर्गात आल्या. त्यावेळी काही मुले घोळका करुन बसले होते. शिक्षक आल्यावर सर्व मुले जागेवर जाऊन बसले.

परंतु पूजा केदारी यांना राग आला. त्यांनी तक्रारदार पालकाच्या मुलास मारहाण सुरु केली. अगदी लाथा-बुक्यांनी मारहाण केली. मागील महिन्यात हा प्रकार घडला होता. त्यावेळी मुलाने हा प्रकार सांगितला नाही. परंतु मुलास मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने तो माझ्या पाहण्यात आला. त्यानंतर मुलाकडे विचारणा केली असता त्याने सविस्तर प्रकार सांगितला, असे पालकांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

पोलिसा ठाण्यात तक्रार

याबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांनी विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पूजा केदारी यांनी यापूर्वी मुलांना मारहाण केल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे. या शिक्षिकेवर बडतर्फीची कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.