शाळेची घंटा वाजणार|1 ली ते 7 वीचे वर्ग गुरुवारपासून सुरु होणार – महापौर मोहळ यांची माहिती
शहरातील कोरोनाची स्थिती लक्षात घेऊनच शाळा सुरु करणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्याच बरोबर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही त्या त्या जिल्ह्यातील स्थानिक प्रशासना सोबत चर्चा करुन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल असे म्हटले होते.

पुणे – पुन्हा एकदा शहरातील शाळेची घंटा वाजणार आहे. पुणे महानगरपालिका हददीतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग येत्या गुरुवारपासून (16 डिसेंबर, 2021) सुरु होणार आहेत. महापौर मुरलीधर मोहळ यांनी बदल नुकतीच माहिती दिली आहे. कोरोना नियमावलीचे काटेकोरपणे पालन करत शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला असून याची पालकांनी नोंद घ्यावी ,असे मोहळ यांनी म्हटले आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत, विभागीय सौरभ राव , महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासोबत चर्चा करुन हा एकमताने निर्णय घेण्यात आला आहे.
पुण्यातील १ ली ते ७ वीचे वर्ग गुरुवारपासून !
पुणे मनपा हद्दीतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग येत्या गुरुवारपासून (१६ डिसेंबर, २०२१) सुरु करण्याचा निर्णय आपण घेतला असून याची पालकांनी नोंद घ्यावी. pic.twitter.com/Kvse0mrGeL
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) December 14, 2021
शाळा सुरु करत असताना ज्या काही नियमावली ठरवण्यात आले आहे, मार्गदर्शक नियमावलीनुसार सर्व शाळांचे निर्जंतुकीकरण असेल , सोशल डिस्टंस असेल अश्या सर्व सूचना देता तसेच त्याची अंमलबजावणी करत शाळा सुरु केल्या जाणार आहेत. त्यामुळे मागील काहीदिवसापासून शाळां कधी सुरु होणार हा जो प्रश्न होता ? तो आता मार्गी लागला आहे.ओमिक्रॉनच्या धोक्यामुळे शहरातील शाळा सुरु करायच्या की नाही? अशी चर्चा सुरू होती. शहरातील कोरोनाची स्थिती लक्षात घेऊनच शाळा सुरु करणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्याच बरोबर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही त्या त्या जिल्ह्यातील स्थानिक प्रशासना सोबत चर्चा करुन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल असे म्हटले होते.
कोरोनाची सद्यस्थिती
- शहरात आज दिवसभरात 71 पॅाजिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
- आज दिवसभरात 90 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
- कोरोनामुळे मृत्यू झालेलया रुग्णांचा आकडा शून्य आहे.
- आतापर्यंत शहरात 507799 इतके पॉजिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत.
- आतापर्यंत एकूण 9109 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
- सदस्यस्थितीला ॲक्टिव्ह रुग्ण 739 इतके आहेत.
- आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 497951
- आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 4168
’इट स्मार्ट सिटीज’ चॅलेंजमध्ये ठाण्याचा देशातील पहिल्या 20 शहरात समावेश
टोकियो पॅरालिम्पिक विजेत्या भाविना पटेलला MG Motor कडून कस्टमाइज्ड एसयूव्ही MG Hector भेट