Pune crime |घृणास्पद घटना: 54 वर्षीय वाहन चालकाकडून गतीमंद मुलीचे लैंगिक शोषण, दोन वर्ष सुरु हा प्रकार
गतिमंद मुलीला घेऊन जाताना तसेच घरी परतताना रस्त्यात गाडी थांबत लैंगिक चाळे करत असत. तसेच अश्लील व्हडिओ दाखवत त्याप्रमाणे कृती करण्यास भाग पाडत होता.
पुणे- माणुसकीला काळिमा फासणारी घटना पुण्यातला घडली आहे. 12वर्षाच्या अल्पवयीन गतिमंद मुलीचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 54 वर्षीय चालकास अटक केली आहे. कोंढवा येथील महिलेने तक्रार दिली आहे. आरोपी चालक हा कात्रज येथील रहिवाशी आहे.
दाखवत असे अश्लील व्हडिओ
2019 पासून ते 10 नोव्हेंबर 2021 पर्यंत पीडित मुलीला वाहनातून शाळेत घेऊन जाण्याचे आणि शाळेतून घरी आणण्याचे काम करत होता. पीडित गतिमंद मुलीला शाळेत घेऊन जाताना तसेच घरी परतताना रस्त्यात गाडी थांबत लैंगिक चाळे करत असत. तसेच अश्लील व्हडिओ दाखवत त्याप्रमाणे कृती करण्यास भाग पाडत होता. पीडित मुलींने याबाबत आपल्या शाळेतील शिक्षिकेला माहिती दिल्यानंतर संबंधित प्रकरणाचा उलघडा झाला. पोलिसांनी घटनेची तातडीने दाखल घेत आरोपीवर गुन्हा दाखल करत अटक केली.
पाणी देण्याच्या बहाण्याने घरात बोलावले
दुसरीकडं पिण्यासाठी पाणी मागण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करून गर्भवती केल्याप्रकरणी 52 वर्षीय नराधमाला 10 वर्षे सक्तमजुरी व 1 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अप्पा यशंवंत साळवे (वय 52, रा. कुसगाव, लोणावळा) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे लोणावळा परिसरात ही घटना घडली होती. यामध्ये 16 वर्षीय पीडित मुलीच्या आई-वडिलांचा मृत्यू झाल्याने ती आजीच्या सोबत राहत होती. मुलीच्या घर शेजारी रेल्वे वसाहतीतील रिकाम्या बंगल्यात आरोपी राहत होता. फेब्रुवारी 2017 मध्ये आरोपीने पिडित मुलीला हाक मारुन पिण्याचे पाणी देण्याच्या बहाण्याने घरात बोलावले व तिच्यावर बलात्कार केला. ही घटना कोणाला सांगितल्यास तिला व तिच्या लहान भावाला मारुन टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर सातत्याने हाच प्रकार केला. काही महिन्यांनी मुलीची पोट दुखू लागल्याने तिला डॉक्टरांकडे नेले. तेव्हा ती गरोदर असल्याचे डॉक्टर तपासणीत आढळून आल्यानंतर हा घृणास्पद प्रकार समोर आला.
त्यानंतर पॉक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यानच्या काळात या पीडित मुलीने बाळाला जन्म दिला पोलिसांनी पिडिता, आरोपी व तिच्या बाळाचे डी एन ए नमुने घेतले. त्याचा अहवाल सकारात्मक आला. या खटल्या प्रकरणी पोलिसांनी जवळपास 7 साक्षीदारांची साक्ष नोंदवली. मात्र याप्रकरणातील महत्त्वाची साक्ष असलेल्या पीडिता व तिच्या लहान भावाचे जानेवारी 21 मध्ये निधन झाले. परंतु तिच्या मृत्यूनंतरही आरोपीवरील गुन्हा सिद्ध करण्यासाठी सादर करण्यात आलेले पुरावे पुरेसे मानता आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरी व 1लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
हे ही वाचा
जळगावमध्ये अज्ञात कारणावरुन तरुणाची गळफास घेत आत्महत्या
बिलासपूर : अल्पवयीन पालकांनीच नवजात बालकाला झुडुपात फेकले, पोलीस तपासात प्रकरणाचा उलगडा