Pune crime| बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणाऱ्याला सिंहगड पोलिसांनी केली अटक
सिंहगड रोडवरील नवले पुलाजवळ एक युवक पिस्तूल घेऊन थांबला असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याने दिला. त्यानुसार गुन्हे प्रतिबंधक विभागाचे पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी व शंकर कुंभार मिळालेल्या माहितीनुसार घटना स्थळावर जाऊन पाहणी केली असता आरोपी प्रशांत तिथे आढळून आला.
पुणे- शहरातील सिंहगड पोलीस ठाण्याच्या हददीत 24 वर्षीय तरुणांकडून देशी बनावटीचे एक पिस्तुल व 2 जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केली आहेत. प्रशांत कांबळे असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.सिंहगड पोलीस स्थानकातगुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी मिळाली माहिती
सिंहगड रोडवरील नवले पुलाजवळ एक युवक पिस्तूल घेऊन थांबला असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याने दिला. त्यानुसार गुन्हे प्रतिबंधक विभागाचे पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी व शंकर कुंभार मिळालेल्या माहितीनुसार घटना स्थळावर जाऊन पाहणी केली असता आरोपी प्रशांत तिथे आढळून आला. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी करताच त्याने पळून जाण्याच्या प्रयत्न केला मात्र तो निष्फळ ठरला. पोलिसांनी त्याच्याकडून ४० हजार रुपये किंमतीचे पिस्तूल जप्त केले आहे.
प्रशांत कांबळेवर यापूर्वीही गुन्हे आरोपी प्रशांत कांबळे याच्या खून व खूनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे पिंपरी-चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल आहेत. पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युसुफ शेख, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले, पोलीस उपनिरीक्षक कुलदिप संकपाळ, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, अमेय रसाळ, किशोर शिंदे, देवा चव्हाण ,सागर भोसले, इंद्रजित जगताप, सुहास मोरे, अमोल पाटील, विकास बांदल यांच्या पथकाने केली.
दुसरीकडे पोलिसानं विरोधातील अर्ज मागे घेण्यासाठी तक्रारदार महिलेकडे 50 लाखांची मागणी करणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्ता सुधीर रामचंद्र आल्हाटला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.पोलिसांनी अण्णा जेऊर, निलेश जगताप, विवेक कोंडे यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत कोथरूड येथील 48 वर्षीय महिलेने पोलिसात तक्रार दिली पाहिजे.
झाले असे की
फिर्यादी महिलेच्या पतीवर डेक्कन पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे. या गुन्हयातून पतीला सोडवण्यासाठी फिर्यादी महिलेने आल्हाट यांची मदत मागितली. मात्र याचा गैर फायदा घेता डेक्कन पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक सोनवणे यांच्या विरुध्द तक्रार अर्ज करा. त्याच्याकडून तुम्हाला त्रास दिल्याचे आठ दिवसता पैसे काढतो, माझ्या पोलीस दलात भरपूर ओळखी असल्याचे संगितले. इतकेच नव्हेतर फिर्यादीला सोनवनेच्या विरोधात अर्ज करण्यास भाग पडले.
त्यानंतर फिर्यादींना घरी बोलावून सोनवणे अर्ज प्रकरणात ५० लाखाच्या खंडणीची मागणी केली. मला पैसे दिले तरच तुम्ही सोनवणे व यांचे विरुध्द केलेले अर्ज मागे घेऊन देईल. अन्यथा तर तुम्हाला पण लटकवुन टाकील, जीवे मारुन टाकील अशी धमकी दिली. तसेच इतर आरोपींनी देखील फिर्यादीवर दबाव टाकल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आल्हाट याला अटक केली आहे.