या व्हिडिओंना लाईक केली तरी होणार चौकशी, पुणे पोलीस आयुक्तांचे आदेश काय?
Pune Police: पुणे शहरात गुंडगिरी अन् गुन्हेही वाढले आहेत. शहरातील गुंडगिरी मोडून काढण्यासाठी पुणे पोलिसांनी पाऊले उचलली आहेत. समाजात हिरो म्हणून वावरणाऱ्या गुंडाच्या प्रत्येक हालचालींवर पोलिसांचे लक्ष असणार आहे. तसेच सराईत गुंड आणि ते वापरत असलेल्या सोशल मीडिया खात्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध व्हिडिओ अन् रिल्स समोर येत असतात. त्या व्हिडिओ अन् रिल्सला लाईक करण्याचा सोपस्कार अनेक युजर करतात. परंतु पुणे पोलीस आयुक्तांनी एक आदेश काढले आहेत. त्यानुसार व्हिडिओला लाईक करणाऱ्यांची चौकशी होणार आहे. दहशत माजवणाऱ्या गुंडांकडून समाज माध्यमांवर व्हिडिओ प्रसारीत केले जातात. या व्हिडिओंना लाईक करुन त्यांचे प्रस्थ वाढवणाऱ्यांवर पोलिसांची नजर असणार आहे. यामुळे सोशल मीडियावर व्हिडिओला लाईक करताना काळजी घेणे गरजेचे आहे.
पुणे पोलिसांचे बारकी लक्ष
पुण्यातील गुंडाच्या विरोधात पोलीस आयुक्त अमितेश कुमार पुन्हा अँक्शन मोडवर आले आहेत. दहशत माजवण्यासाठी सोशल मीडियावर गुन्हेगारांकडून व्हिडिओ प्रसारित करण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अशा प्रकारचे रील प्रसारित करणाऱ्या गुंडांची झाडाझडती घेण्याचे आदेश गुन्हे शाखेच्या पथकांना दिले आहेत.
या प्रकारच्या व्हिडिओवर…
व्हिडिओला लाइक देणाऱ्यांचीही चौकशी पोलिसांकडून केली जाणार आहे. वाढदिवसाला तलवारीने केक कापणे, कोयते उगारून दहशत माजवणे, तसेच सोशल मीडियावर ‘स्टेटस’वर शस्त्रांचे फोटो प्रसारित करण्याच्या घटना पुन्हा वाढू लागल्या आहेत. या प्रकारच्या व्हिडिओंना लाईक करणे आता इंटरनेट युजरच्या अंगलट येणार आहे.
गुंडांच्या सोशल मीडियावर…
पुणे शहरात गुंडगिरी अन् गुन्हेही वाढले आहेत. शहरातील गुंडगिरी मोडून काढण्यासाठी पुणे पोलिसांनी पाऊले उचलली आहेत. समाजात हिरो म्हणून वावरणाऱ्या गुंडाच्या प्रत्येक हालचालींवर पोलिसांचे लक्ष असणार आहे. तसेच सराईत गुंड आणि ते वापरत असलेल्या सोशल मीडिया खात्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे सर्वसमान्य लोकांनीही सोशल मीडियावरील व्हिडिओला लाईक करताना जर जपूनच करावे. आपण कोणत्या व्हिडिओला लाईक अन् शेअर करतो, त्याचा विचार करुनच त्यावर लाईक, शेअर अन् कॉमेंट कराव्यात.