Pune crime | पुण्यात उधार व्हिस्की न दिल्याच्या रागातून एकाने वाईन शॉप मालकाच्या डोक्यात घातला कोयता

मांजरी परिसरातच उधार बिअरची बॉटल देत नसल्याच्या कारणावरून दुकान मालकाच्या डोक्यात कोयता मारत त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. विलास वाईन शॉप येथेही घटना घडली आहे

Pune crime | पुण्यात उधार व्हिस्की न दिल्याच्या रागातून एकाने वाईन शॉप मालकाच्या डोक्यात घातला कोयता
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 10:36 AM

पुणे – वाढत्या गुन्हेगारी बरोबरच शहरात नागरिकांवर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे अशातच पुण्यतील मांजरी परिसरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उधार दारू न दिल्याच्या कारणावरून दोघांनी दुकानदाराला जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. घटनेचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे उधार व्हिस्की न दिल्याच्या रागातून थेट  दुकान मालकाच्या डोक्यात कोयत्याने हल्ला करत जखमी करण्यात आले आहे.

डोक्यात घातला कोयता मांजरी परिसरातच उधार बिअरची बॉटल देत नसल्याच्या कारणावरून दुकान मालकाच्या डोक्यात कोयता मारत त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. मांजरी येथील विलास वाईन शॉप येथेही घटना घडली आहे. या घटनेत वाईन शॉपचे मालक मंगेश साबळे जखमी झाले आहेत. राहुल घटनेच्या दरम्यान राहुल दत्तात्रय घुले याने वाईन शॉपमध्ये येत उधार व्हिस्कीच्या बाटलीची मागणी केली. त्यावेळी उधार बिअर देण्यास नकार दिल्याने चिडलेल्या राहुलने मंगेश साबळे यांच्या डोक्यात कोयत्याने हल्ला केला. यात मंगेश गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी आरोपी राहुल घुलेला पोलिसांनी अटक केली आहे. त्यालापाच दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं

हडपसरमधील मांजरी परिसरात दरडे मार्गावर शिवाज्ञा बिअर शॉपी आहे. घटनेच्या दिवशी रात्री ११ वाजता आरोपी तिथे आला. शिवाज्ञा बिअर शॉपी मध्ये उधार दारू देण्याची मागणी केली. मात्र उधार दारू मिळणार नसल्याचे शॉपीतील विक्रेत्याने स्पष्ट केले. उधार दारू देण्यास नाही म्हटल्याचा राग  दोघांनी जणांच्या टोळक्याला आला. त्यांनी तिथेच शॉपी मालकाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता दुकानात विक्रीसाठी थांबलेल्या विक्रेत्याला दगडाने मारहाण करण्यास सुरुवात केली आहे. दुकानदाराला पाठीवर, डोक्याला विक्रेत्याला गंभीर दुखापत झाली आहे.

पोलिसांनी केली करवाई शिवाज्ञा बिअर शॉपी मालक साईराज हिंगणे यांनी घडलेल्या घटनेबाबत हडपसर पोलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी संतोष घुले गोपाळपटी, व ओमकार घाडगे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या दोघांनाही अटक करण्यात आली असून, पाच दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी दिली आहे. आरोपी ओमकार घाडगे याच्यावर यापूर्वीही गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

नुकसानीची अवकाळी : खरिपाची उरली-सुरली आशाही मावळली, रब्बी पिकांनाही वातावरणाचा धोका

Aurangabad Crime: पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण संस्थेत देशी दारूचा अड्डा, औरंगाबादेत सहा जणांना बेड्या!

Pench Tiger | गंभीर जखमी अवस्थेत फिरत होती वाघीण; मृत्यू कशामुळं झाला असेल यावर चर्चा?

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.