Recruitment scam| परीक्षा भरती घोटाळ्यात आर्थिक फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांनी पुढे येत तक्रार द्यावी -भाग्यश्री नवटक्के
एमआयडीसीच्या भरती परीक्षा ही मे अॅपटेक लिमिटेड कंपनीकडून घेण्यात आली होती. दिल्ली आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाने या कंपनीला काळ्या यादीत टाकलेले आहे. कंपनीने घेतलेल्या या एमआयडीसीच्या परीक्षेत परीक्षार्थींना 99-196 गुण मिळाले आहेत. मात्र त्याच विद्यार्थ्यांना त्या आधी काही दिवसांपूर्वी झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या परीक्षेत मात्र 14 ते 33 गुण मिळाले आहेत.
पुणे- आरोग्य भरती, म्हाडानंतर पुणे पोलिसांनी टीईटी परीक्षेत झालेला घोटाळा उघड केला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना अटक केली आहे. या प्रकरणात पैसे घेऊन फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांनी पुढे येत टाकणारा नोंदवण्याचे आवाहन पुणे सायबर शाखेच्या डीसीपी भाग्यश्री नवटक्के यांनी केलं आहे. यामध्ये स्वतः: विद्यार्थ्यांनी येऊन माहिती दिल्यास कारवाई केली जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःहून पुढे यावं असे म्हटलं आहे. मात्र त या घोटाळ्याचा तपास करताना विद्यार्थ्यांनी पैसे दिल्याचे सिद्ध झाल्यास त्या विद्यार्थ्यांवर कारवाई करत गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या घोटाळ्याच्या तपासाठी सायबर पोलिसांच्या मदतीला आता गुन्हे शाखेची तीन युनिट आली आहेत. त्यामुळे तपासाला आणखी वेगा येणार आहे.
एमआयडीसीच्या भरती परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप
आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी परीक्षेतील घोटाळा उघड झाल्यानंतर आता एमआयडीसीच्या भरती परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. एमआयडीसीच्या भरती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निकालावर एमपीएससी समन्वय समितीने केलं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
काळ्या यादीतील कंपनीकडून घेण्यात आली परीक्षा एमआयडीसीच्या भरती परीक्षा ही मे अॅपटेक लिमिटेड कंपनीकडून घेण्यात आली होती. दिल्ली आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाने या कंपनीला काळ्या यादीत टाकलेले आहे. कंपनीने घेतलेल्या या एमआयडीसीच्या परीक्षेत परीक्षार्थींना 99-196 गुण मिळाले आहेत. मात्र त्याच विद्यार्थ्यांना त्या आधी काही दिवसांपूर्वी झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या परीक्षेत मात्र 14 ते 33 गुण मिळाले आहेत. बई महानगरपालिकेची परीक्षा ही टाटा कंपनीकडून घेण्यात आली आहे. या दोन्ही परीक्षेतील गुणात्मक फरक बघता यामध्ये काहीतरी काळंबेरं असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. याबाबत लवकरच पुणे पोलिसांच्या सायबर विभागाकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे समन्वय समितीने म्हटले आहे.
TET Exam scam| पुणे पोलिसांची विविध शहरात छापेमारी सुरु ; तपासासाठी पोलीस पथकांमध्ये वाढ
महिलांसाठी खुशखबर! आता रेल्वेतही मिळणार आरक्षित सीटची सुविधा, प्रवास होणार आरामदायी
आता तुरीच्या विम्याचा प्रश्न ऐरणीवर, विमा कंपन्यांची टाळाटाळ, प्रशासनाचा मात्र पाठपुरावा